लिंब - तीनशे वर्षे न आटलेली बारा मोटेची विहीर. 
पश्चिम महाराष्ट्र

कधीच न आटलेली बारा मोटेची विहीर

राजाराम ल. कानतोडे

सोलापूर - तीव्र उन्हाळ्याने धरणे तळाला गेली आहेत, विहिरी आटल्या आहेत. पाण्यासाठी माणसे दाहीदिशा फिरत असताना साताऱ्याजवळची लिंब गावातील इतिहासकालीन बारा मोटेची विहीर गेली ३०० वर्षे कधीच आटली नाही. सन १७१९ मध्ये बांधकामाला सुरवात झालेल्या या विहिरीला ३०० वर्षे झाली आहेत. इतिहासाची साक्ष देणारी ही विहीर आजही पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी तितकीच उपयोगी पडत आहे.  

ही विहीर संभाजीराजे यांचे सुपुत्र शाहू महाराज (पहिले शाहू महाराज) यांच्या काळात बांधली आहे. बांधकाम सन १७१९ ते १७२४ यादरम्यान शाहू महाराजांची पत्नी वीरूबाई यांच्या देखरेखीखाली झाले. विहिरीची खोली ११० फूट असून रुंदी साधारण ५० फूट आहे. लिंब गाव परिसरात आमराईच्या पाणी व्यवस्थेसाठी ही विहीर बांधली गेली. विहीर शिवलिंगाच्या आकाराची आहे. ती भुयारी राजवाडाच वाटते. विहिरीत उतरायला आलिशान जिना आणि भव्य कमान आहे. विहिरीवर १५ मोटा बसवण्याची सोय दिसते. प्रत्यक्ष १२ मोटा चालत असत. त्यामुळे तिला बारा मोटेची विहीर म्हणतात, असे येथील गाइड रवी वर्णेकर यांनी सांगितले. 

आता विहिरीवर आसपासची शेती भिजते. लोकांची पिण्याच्या पाण्याची गरज विहीर भागवते. ही ऐतिहासिक विहीर पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. अष्टकोनी मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती उपविहीर या दोन्ही विहिरींना जोडणारी इमारत म्हणजे एक महाल आहे. आलिशान जिना उतरून खाली महालाच्या तळमजल्यावर जाता येते.

सोलापुरातील २० जणांच्या पर्यटकांच्या अभ्यासगटाने नुकतीच शिवकालीन इतिहासाची साक्षीदार असलेली ही ‘बारा मोटेची विहीर’ पाहिली. आम्ही चकित झालो. हेमाडपंथी बांधकाम असलेली ही विहीर परिसरासाठी उपयोगी आहे. 
- तिपय्या हिरेमठ, पर्यटक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT