kolha.jpeg 
पश्चिम महाराष्ट्र

विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला येथे वनविभागाकडून जीवदान

सकाळवृत्तसेवा

कडेगाव (सांगली)- कडेपूर (ता. कडेगाव) येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वन विभागाच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले.त्याला विहिरीतून बाहेर काढून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.


कडेपुर येथील अस्लम पठाण यांच्या शेतातील विहिरीत कोल्हा हा वन्य प्राणी पडला होता.तर शेतकरी श्री. पठाण हे विहिरीवर मोटार सुरु करण्यासाठी गेले असता त्यांना आपल्या विहिरीत कोल्हा पडल्याचे निदर्शनास आले.प्रथम त्यांनी कोल्ह्याला विहिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.विहिरीत पाणीही कमी असले तरी विहिरीला पायऱ्या नसल्याने त्याना कोल्ह्याला बाहेर काढण्यात यश आले नाही. त्यामुळे त्यांनी याबाबत तात्काळ कडेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनपाल राजेश पाटील यांना दूरध्वनीवरून याबाबत माहिती दिली. 


त्यानंतर कडेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राजेश पाटील व वनरक्षक अनिल कुंभार तसेच तानाजी धुलुगडे, प्रकाश कुंभार,रमेश रजपुत यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने व जाळीच्या सहाय्याने विहिरीत पडलेल्या कोल्हयाला विहिरीतून यशस्वीरीत्या व सुखरुपपणे बाहेर काढले व त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT