Lockdown due to Corona Patient at Nighos 
पश्चिम महाराष्ट्र

VIDEO : निघोजची ती व्यक्ती बाधित नव्हे संशयित, अजून रिपोर्ट पाठवायचाय

ok

नगर -  नगर जिल्ह्याच्या चोहोबाजूने कोरोनाने हात आणि पाय दोन्ही पसरवायला सुरूवात केली आहे. जिल्ह्यात रूग्ण सापडला तरी सर्वसामान्य लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. आता तर तालुक्या-तालुक्यात रूग्ण सापडू लागले आहेत. पारनेर तालुक्यातही एक संशयित सापडला आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने संपूर्ण गाव लॉकडाऊन केले आहे.

संबंधित रूग्ण ही महिला असून ती मंबईहून आली आहे. प्रशसानाने तिला नगरला उपचार व खात्रीसाठी हलवले आहे. निघोजमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समजताच सर्वच लोकांची पाचावर धारण बसली. संबंधित महिललेला निघोजला येऊन बरेच दिवस झाले. मात्र, तिला खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी नगरला हलवले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत २५ रूग्ण बाधित आढळले आहेत. त्यातील एका रूग्णावर पुण्यात उपचार सुरू आहे. तो तरूण बाधित श्रीरामपूर तालुक्यातील एका खेडेगावातील आहे. विशेष म्हणजे तो दिव्यांग आहे. नेमकी कोणामुळे त्याला बाधा झाली, याविषयी तालुका प्रशासन तपास करीत आहे. काल रात्री उशिरा तीन व्यक्ती बाधित सापडल्या आहेत. त्यातील दोन आलमगीर परिसरातील तर एक व्यक्ती ही सर्जेपुरा येथील आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत जामखेड, नेवासा, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर तालुक्यातील रूग्ण बाधित आढळले आहेत. यातील बहुतांशी रूग्ण परदेशातील किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना ही लागण झाली आहे.

अजून नमुने तपासणीला पाठवायचेत

संबंधित रूग्णाला खोकला आहे. या पार्श्वभूमीवर त्या व्यक्तीला नगर येथील सिव्हील हॉस्पीटल येथे पाठवले आहे. तेथे त्या व्यक्तीच्या घशातील स्त्रावाचे नमुने एनआयव्हीकडे पाठवले जातील. त्यानंतर रिपोर्ट येईल. मगच काय ते सांगता येईल.

-सुधाकर भोसले, प्रांधिकारी, पारनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT