lockdown impact working for people at belgaum
lockdown impact working for people at belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

गावी आल्याचे समाधान पण पुढे काय...?

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : कोरोनाच्या संकटामुळे आपल्या गावी परतल्याचे समाधान मिळालेल्या हजारो कामगारांना आपल्या भविष्याची चिंता लागुन राहिली आहे. तसेच परिस्थिती लवकर पुर्वपदावर आली नाही तर पुढे काय असा प्रश्‍न बेळगाव, खानापूर आदी भागातील कामगारांना पडला आहे. सध्या पुणे, मुंबई व इतर भागातुन आलेले नागरीक शेती कामात आपल्या कुटुंबाला हातभार लावीत आहे. परंतु कोरोनाचे संकट असेच राहिले तर येणारा काळ कामगारांसाठी अवघड ठरणार आहे. 


बेळगाव, खानापूर, हल्याळ आदी भागातील अनेक युवक मोठ्‌या संख्येने पुण्याला नोकरीला आहे. तर काहीजण व्यवसाय व इतर कामांसाठी पुण्याला असतात. यापैकी अनेक कामगार लॉकडाऊन जाहीर होण्यापुर्वी आपल्या गावी परत आले आहेत. तर काही कामगार लॉकडाऊन शिथील केल्यानंतर आपल्या गावी परतत आहेत. मात्र पुणे आणि महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महाराष्ट्रात अधिक प्रमाणात सुट देण्यात आलेली नाही. त्यामुळे कामगारांची चिंता वाढत असुन सर्व व्यवहार सुरळीत झाले तरी येणाऱ्या काळात परत जाण्याची लवकर परवानगी मिळणार का याबाबतही कामगारांमध्ये सांक्षकता असुन गावी येऊन पोहचल्याचे समाधान असले तरी येणारा काळ पुणे, मुंबई व इतर ठिकाणी कामास असलेल्या कामगारांना त्रासदायक ठरणार आहे.

पुणे व इतर भागातुन आलेल्या कामगारांसमोर प्रश्‍न 
लॉकडाऊनमुळे आपल्या गावी परतलेल्या अनेक कामगारांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असुन दररोज कामाची सवय असलेल्या कामगारांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. अनेकजण पुणे व इतर भागात वास्तव्यास आहेत त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍नही अनेक कामगारांसमोर उभा ठाकला आहे त्यामुळे कोरोनाचे संकट लवकर दुर व्हावे अशीच अपेक्षा प्रत्येक कामगार करु लागला आहे. 

हेही वाचा- जीव पडला भांड्यात ; गोवा सरकारने त्याला काल पॉझीटीव्ह घोषीत  केले अन् आज तो झाला निगेटीव्ह....

मार्च महिन्याच्या अखेरीस पुण्यावरुन गावाकडे आलो आहे. तेंव्हापासुन वडीलांना शेती कामात मदत करीत आहे. मात्र कोरोनाचे संकट लवकर दुर होणे आवश्‍यक आहे. अन्यथा सर्वांनाच मोठा फटका बसणार आहे. गावाकडे परतलेल्या कामगारांसाठी सरकारने मदतीचा हात पुढे करणे आवश्‍क आहे. 
सुनिल गुरव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS Live Score : अभिषेक-क्लासेनची शानदार खेळी, हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये; मात्र पंजाबची पराभवासह सांगता

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

SCROLL FOR NEXT