meat.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

"लॉकडाउन' मध्ये मटण दराचा भडका...चक्क इतकी झाली वाढ

सकाळवृत्तसेवा

सांगली- "कोरोना' च्या पार्श्‍वभूमीवर जनावरांचे बाजार बंद असल्याचा फटका मटण विक्रेत्यांना बसला आहे. परिणामी मटण विक्रेत्यांनी देखील अघोषित दरवाढ केली आहे. सध्या मटणाचा किलोचा दर 650 रूपये झाला आहे. त्यामुळे खवय्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. तर दुसरीकडे ऐन उन्हाळ्यात चिकनच्या दराचा देखील भडका उडाला असून 240 रूपये किलोने विक्री सुरू आहे. 

"कोरोना' च्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन आणि संचारबंदी केल्यापासून मटणप्रेमींची अडचण होऊन बसली आहे. लॉकडाउनपूर्वी चिकनबाबत अफवा पसरल्यामुळे चिकन सेंटरवाल्यांना अक्षरश: शंभर रूपये किलोपर्यंत विक्री करावी लागली. काही ठिकाणी तर फुकट कोंबड्या वाटण्यात आल्या. त्यामुळे मटणाची मागणी वाढली. धुळवडसाठी लोकांनी रांग लावून मटण खरेदी केली. लॉकडाउनपूर्वी मटणाचा दर 540 ते 560 रूपये किलो इतका होता. लॉकडाउनमध्ये मटण व चिकन विक्रीची दुकाने देखील बंद झाली. मात्र ग्रामीण भागात मटण विक्री चोरी-छुपे सुरू होतीच. काही ठिकाणी सकाळी लवकर बोकड कापून मटणाचे वाटे तयार करून विकले जाऊ लागले. तेव्हाही मटणाचा दर स्थिरच होता. 

लॉकडाउनच्या काळात आठवडा बाजार तसेच जनावरांचे बाजार सुरू करण्यास मनाई केली आहे. त्याचा परिणाम गावोगावचे जनावरांचे बाजार बंद झाले आहेत. कोट्यवधी रूपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. यात्रा-जत्रा, उरूस बंद असल्यामुळे जनावरांची मागणी काही प्रमाणात ठप्प झाली आहे. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात दुकाने उघडण्यास परवानगी दिली गेली. त्यामुळे मटण व चिकन विक्री सुरू झाली आहे. परंतू जनावरांचे बाजार बंद असल्यामुळे मटण विक्रेत्यांना तुटवडा भासू लागला आहे. सध्या जादा दराने त्यांना माल मिळत असल्यामुळे ते देखील जादा दराने मटण विकत आहेत. परिणामी मटणाचा दर महिन्याभरातच 560 रूपयांवरून 650 रूपये इतका झाला आहे. मटणाच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे खवय्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. सध्या हॉटेल बंदच आहेत. फक्त पार्सल विक्री सुरू आहे. त्यालाही प्रतिसाद नाही. परंतू घरोघरी आठवड्याला मटणाचा बेत आखला जात असताना दरवाढीमुळे नाराजी व्यक्त होत आहे. 

मटणाऐवजी चिकनला पसंती- 
मटणाला पर्याय म्हणून अनेकजण चिकनला पसंती देतात. परंतू लॉकडाउनपूर्वी पोल्ट्री व्यवसायिकांना मोठा फटका सहन करावा लागला. अनेकांनी पोल्ट्रीच्या बॅच काढल्या नाहीत. त्यामुळे बाजारात अचानक चिकनचा तुटवडा भासू लागला होता. सध्या मटण दरवाढीमुळे चिकनला मागणी वाढली आहे. त्यामुळे चिकनचा भाव वाढवण्यात आला आहे. लॉकडाउनपूर्वी चिकनचा दर 160 ते 180 रूपये होता. तो दर काही दिवसापूर्वी दोनशे रूपयेवर पोहोचला. सध्या 240 रूपये दराने चिकनची विक्री सुरू आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : मविआचं सरकार पाडण्यासाठी ५ हजार कोटी खर्च, ठाकरेंच्या खासदाराचा गंभीर आरोप

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT