budhgaon.jpg
budhgaon.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

बुधगाव ग्रामपंचायतीला ठोकले टाळे...पिण्याच्या पाण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन

विष्णू मोहिते

कवलापूर (सांगली)- बुधगाव शहराला गेली महिनाभर पिण्याचे पाणी बंद आहे. या विरोधात निवेदन देण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत गाठली. निवेदन स्विकारण्यासाठी सरपंच तसेच ग्रामसेवक गैरहजर राहिले. कार्यकर्त्यांनी संतापाने निवेदन खुर्चीला चिकटवले तसेत ग्रामपंचायत कार्यालयासही टाळे ठोकले. 

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधगावला गेली महिनाभर पिण्याचे पाणी पिण्याचे पाणी बंद आहे. ग्रामपंचातीने पाणीपुरवठा लवकर सुरू करावा यासाठी बुधगाव शिवसेनेतर्फे निवेदन देण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते जमले. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच व विकास अधिकारी यांना दूरध्वनीवरुन वारंवार निवेदन स्विकारावे, अशी विनंती केली. मात्र ते जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्याच्या रागातून कार्यकर्त्यांनी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या खुर्चीला निवेदन चिटकवले. ग्रामपंचायतीलाही टाळे ठोकले. शिवसेना कार्यकर्त्यांनी सत्ताधारी गटाचा यावेळी निषेध व्यक्त केला. 

शिवसेना जिल्हा संघटक बजरंग पाटील, तालुका प्रमुख गजानन मोरे, शहरप्रमुख सतिश खांबे, रामदास पाटील ,अरविंद पाटील ,बटू पाटील, सतिश मस्के, सतिश हिवरे, उत्तम कोळी, सुनिल आवळे, अजिंक्‍य इंगळे, शहाजी पाटील, उमेश क्षीरसागर, अशोक पाटील, मोहन माने, शिवाजी रसाळे व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दमदार सुरुवातीनंतर दिल्लीला दोन मोठे धक्के! फ्रेझर-मॅकगर्कनंतर शाय होपही बाद

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT