Uday Samant on Kiran Samant Post esakal
पश्चिम महाराष्ट्र

Uday Samant: रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेचीच! उदय सामंतांनी सांगितलं ट्विट करण्यामागचं कारण म्हणाले, 'CM शिंदेंना...'

Uday Samant on Kiran Samant Post: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंत यांनी माघार घेतली होती. मात्र, त्या जागेवर आमचा दावा कायम आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Uday Samant on Kiran Samant Post: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असतानाच मतदार संघावर दावे प्रतिदावे केले जात असतानाच शिवसेना शिंदे गटाने रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपसाठी सोडला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती, यादरम्यान मोठा ट्विस्ट आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्याची चर्चा राजकारणात सुरू झाली. याचे कारण म्हणजे त्यांनी सोशल मिडीयावर केलेली पोस्ट. तर उदय सामंत यांनी त्या जागेवर आमचा दावा कायम आहे, असं म्हटलं आहे.

विदर्भ दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंत यांनी माघार घेतली होती. मात्र, त्या जागेवर आमचा दावा कायम आहे. काल त्यांनी घेतलेला निर्णय भावनिक होता. मात्र, ही जागा शिवसेनेकडे राहावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे. मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. मात्र, हि जागा आमच्याकडे राहावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. किरण सामंत यांनी केलेलं ट्विट मागं घेतलं आहे, असंही ते पुढे म्हणालेत.

काय केली होती पोस्ट

मा. नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान होण्याकरिता व अब कि ४०० पार होण्याकरिता रत्नागिरी - सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघातून किरण सामंत यांची माघार - किरण सामंत.

किरण सामंत यांच्या या पोस्टचे स्क्रिनशॉट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. पण नंतर किरण सामंत यांच्या अकाऊंटवर ही पोस्ट दिसेनासी झाली. काल रात्री उशिरा सोशल मिडीयाच्या माध्यमातून माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यामुळे आता रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील शिवसेना आणि भाजप यामधील वाद मिटले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर मोठी राजकीय घडामोड दिसून येत आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी नारायण राणे यांचा मार्ग मोकळा झाल्याच्या चर्चा आहेत. नारायण राणे आज सिंधुदुर्गमधून प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshaya Tritiya Gold 2026: सोनं वाढेल की घसरेल? ‘भाव पडल्यावर खरेदी’चा मोतीलाल ओसवालचा सल्ला

Iran-Us War: आता काय बिनसलं? होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद; कारण सांगत इराणचा कठोर निर्णय

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात झळकणार गायक अतुल गोगावलेचा लेक, गाण्यात दिसली झलक

RCB vs DC: फॉर्ममध्ये असलेल्या बंगळुरूविरुद्ध अक्षर पटेलने जिंकला टॉस! बर्थडे बॉय केएल राहुलकडे असणार लक्ष; पाहा Playing XI

MPSC Success : दगड फोडणाऱ्याची मुलगी झाली अधिकारी! लोणीच्या मोहिनीची महसूल सहाय्यकपदावर झेप; तिचा संघर्ष वाचून डोळ्यात येईल पाणी

SCROLL FOR NEXT