पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : जोरदार शक्तीप्रदर्शनासह धैर्यशील माने यांचा अर्ज दाखल

संभाजी थोरात

कोल्हापूर -  हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात जोरदार शक्तिप्रदर्शन करत फेरीद्वारे अर्ज दाखल केला. या फेरीस बहुजन विकास रथ असे नाव देण्यात आले होते. यामध्ये  बाराबलुतेदारासह, अठरापगड जातीतले लोक एका ट्रॅक्टरमध्ये बसवून आणले होते.

आमदार उल्हासदादा पाटील हे स्वतः ट्रॅक्टर चालवत होते. तर त्यांच्या एका बाजूल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व दुसऱ्या बाजुला धैर्यशील माने ट्रॅक्टरवर बसले होते. मंत्री सदाभाऊ खोत, माजी खासदार निवेदिता माने यांनीही या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. आमदार राजेश क्षीरसागर, सुजित मिणचेकर उपस्थित होते. 

खासदार राजू शेट्टी नेहमी बैलगाडीतून येतात मात्र धैर्यशील माने यांनी ट्रॅक्टरमधून येऊन अर्ज दाखल केला. बाराबलुतेदार आणून ही निवडणूक जातीय मुद्द्यावर होईल असे यातून स्पष्ट होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना मंत्री किरेन रिजिजू दोनदा भेटले; सत्ताधारी-विरोधकांची कोंडी फुटणार का? विरोधी पक्षनेते काय म्हणाले?

Shivsena Supreme Court Hearing: शिंदेंना घाम फोडणारा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद, आज सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Marathi News Live Updates : राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले यांची निवड

Rashi Bhavishya: कामिका एकादशीला महालक्ष्मी राजयोग; 'या' ३ राशींचं नशीब उजळणार? आयुष्यात येणार सुख-समृद्धी, ते पैशांसोबत नशिबाची साथ

PM Shri Innovation Visit: राज्यस्तरीय पाहणीमध्ये पीएम श्री गणोरी शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची दाद

SCROLL FOR NEXT