पश्चिम महाराष्ट्र

Election Results : माजी खासदारांचे वारसदार संसदेत 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - जिल्ह्याच्या राजकारणात माजी खासदारांचे वारसदार पुन्हा संसदेत पाठवून देण्याची किमया जिल्ह्यातील मतदारांनी केली आहे. कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक व हातकणंगलेतून धैर्यशील माने यांनी शिवसेनेच्या तिकिटावर मातब्बर उमेदवारांचा पराभव करून एकच धक्का दिला आहे. 

प्रा. मंडलिक माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र. (कै.) मंडलिक म्हणजे लढावू बाणा, तत्त्वाशी कोणत्याही स्थितीत तडजोड न करणार नेता आणि आयुष्यभर ज्यांनी प्रत्येक टप्प्यावर संघर्ष केला असे नेतृत्व. कै. मंडलिक यांनी पहिल्यांदा 1999 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली. त्याचवर्षी कॉंग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली होती.

कै. मंडलिक राष्ट्रवादीचे उमेदवार होते, त्यांच्या विरोधात सलग पाचवेळा लोकसभा जिंकलेले कॉंग्रेसचे उमेदवार कै. उदयसिंगराव गायकवाड होते. अटीतटीच्या लढतीत कै. मंडलिक तब्बल 1 लाख 8 हजार 910 मतांनी विजयी झाले. हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वांत मोठा विजय. त्यानंतर 2004 च्या निवडणुकीत त्यांचा सामना आताचे राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्याशी झाला; पण या लढतीतही त्यांनी श्री. महाडिक यांना आसमान दाखवले.

2009 च्या निवडणुकीत कै. मंडलिक यांनाच राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली. त्यातून स्वाभिमान दुखावलेल्या कै. मंडलिक यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आणि तब्बल 44 हजार मतांनी त्या वेळचे राष्ट्रवादीचे उमेदवार संभाजीराजे छत्रपती यांचा पराभव केला. त्यांचे पुत्र प्रा. संजय मंडलिक यांनी एकदा झालेला पराभव पचवून पुन्हा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि हे मैदान त्यांनी लीलया मारत खासदार महाडिक यांचा तब्बल दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव करून संसदेत प्रवेश मिळवला. 

हातकणंगलेच्या माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांनी या मतदारसंघाचे दोनवेळा प्रतिनिधीत्त्व केले. तत्पुर्वीच 25 वर्षे या मतदारसंघाचे खासदार पद त्यांचे सासर (कै.) बाळासाहेब माने यांच्याकडे होते. श्रीमती माने यांनीही 1998 मध्ये पहिली निवडणूक सेनेच्या तिकिटावरच लढवली होती; पण त्यात त्यांचा 12 हजार मतांनी पराभव झाला. त्यानंतर 1999 व 2004 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्यांनी या मतदारसंघाची निवडणूक जिंकली. 2009 च्या निवडणुकीत त्यांचा खासदार राजू शेट्टी यांनी लाखाच्या मतांनी पराभव केला. आजोबा आणि आईंचा संसदेतील वारसा लाभलेल्या धैर्यशील माने यांनी यावेळी शिवसेनेच्या तिकिटावर श्री. शेट्टी यांचा लाखाच्या मतांनी पराभव करून आपल्या आईच्या पराभवाचा बदला घेतला. 

पंधरा वर्षांनी मानेंचा गुलाल 
2009 च्या निवडणुकीत हातकणंगलेतून श्रीमती माने यांचा पराभव झाला, त्यानंतरच्या म्हणजे 2014 च्या निवडणुकीत ही जागा कॉंग्रेसला गेली, त्यामुळे माने घराणे निवडणुकीपासून अलिप्त राहिले. आज तब्बल 15 वर्षांनी माने यांच्या घरात विजयाचा गुलाल उधळला गेला. प्रा. मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी 2009 मध्ये वावटळात दिवा लावला, त्यानंतर 2014 मध्ये प्रा. मंडलिक पराभूत झाले. त्यांच्याही घरी तब्बल दहा वर्षांनी विजयाचा गुलाल उधळला गेला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT