पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : वडा-पाव, पोहे, उपीट १० ते २० रुपये

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीसाठी एक प्लेट वडा-पाव, पोहे, उपीट, शिरा व एक ग्लास कोकम, लस्सी असे प्रत्येकी १० ते २० रुपये, तर चहासाठी ५ ते १० रुपये असे खर्चाचे स्टॅंडर्ड दर निश्‍चित केले आहेत. प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांची मागणी असणाऱ्या मटण थाळीसाठी १५० ते २०० रुपये दर निश्‍चित आहे. प्रत्येक उमेदवारांना या दरापेक्षा कमी दराने निवडणूक खर्च सादर करता येणार नाही, असा निवडणूक खर्चाचा अंतिम दर तक्ता तयार आहे.

निवडणूक ग्रामपंचायतीची असो किंवा लोकसभेची, यामध्ये वारेमाप खर्च हा होतोच. अशा वारेमाप खर्चाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या जिल्हास्तरीय निवडणूक खर्च परीक्षण व व्यवस्थापन समितीने हे दर निश्‍चित केले आहेत.

खाद्यपदार्थ एक कप चहा ५ ते १० रुपये, कॉफी १५ रुपये, वडा-पाव, पोहे, उपीट, शिरा, लस्सी, कोकमसाठी प्रत्येकी १० ते २० रुपये, समोसा, मिसळ, १५ ते २५ रुपये, तर मटण ताट १५० ते २०० आणि शाकाहारी थाळी ८० ते १०० रुपये. प्रचारासाठी वाहन खर्च दुचाकी वाहनासाठी प्रतिलिटर ४० किलोमीटर ॲव्हरेज धरले  आहे. २४ तास वाहन वापरण्यासाठी ७०० रुपये खर्च निश्‍चित केला आहे. ऑटो रिक्षासाठी १ हजार ५० रुपये, चारचाकीसाठी १ हजार ८०० रुपये तसेच मोठ्या वाहनांसाठी १८०० ते ३००० रुपयांपर्यंत दर निश्‍चित केला आहे. ५० आणि ७० आसन क्षमता असणाऱ्या बस व वाहनांसाठी ६ हजार ६०० ते ७ हजार ५०० रुपयांपर्यंत दर आकारला जाणार आहे.

प्रचार सभा, रॅली 
सभा मंडपासाठी प्रतिदिन ९ रुपये ४४ पैसे प्रतिचौरस फूट, लाकडी मंच २९.५० रुपये, प्लास्टिक खुर्च्या २५ रुपये, व्ही.आय.पी. खुर्च्या १०६ रुपये, पुष्पगुच्छ, हार-तुरे ३०० ते ५०० रुपये असे विविध वस्तूंवर खर्चाचे नियोजन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT