Udayanraje-and-Narendra
Udayanraje-and-Narendra 
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : युतीच्या एकदिलातच ‘करून दाखविण्या’ची संधी

राजेश सोळसकर

माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील हे उदयनराजेंविरोधात शिवसेनेतून निवडणूक लढविणार असल्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. तसे झाल्यास सातारा लोकसभा मतदारसंघाचे चित्र कसे असेल?  

सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात कोण याविषयी गेल्या काही दिवसांपासून असलेला सस्पेन्स आता काहीसा पुसट होऊ लागला आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील हेच उदयनराजेंच्या विरोधात दंड थोपटणार आहेत, असं सांगितलं जातंय. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा होतीच; पण आता त्यामध्ये थोडं ट्विस्ट आलं आहे. ताज्या बातमीनुसार श्री. पाटील हे भाजपऐवजी आता शिवसेनेच्या तिकिटावर आखाड्यात उतरणार आहेत. येत्या २४ तारखेला होणाऱ्या युतीच्या महामेळाव्यात ते रीतसर शिवबंधन स्वीकारतील आणि युतीचा उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा होईल, असे राजकीय गोटातून सांगण्यात येतंय.

श्री. पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यास ते या मतदारसंघात काय परिणाम घडवू शकतील, हे पाहण्यासाठी अनेक शक्‍यतांचा विचार करावा लागेल. त्यासाठी काही काळही जावा लागणार असला, तरी उदयनराजे यांच्यासाठी ही लढत पूर्वीइतकी सहजसोपी राहणार नाही, असे राजकीय जाणकारांना वाटते. विशेषतः उदयनराजेंच्या मताधिक्‍याचं गणित मांडणाऱ्यांना आणखी काही समीकरणांचा विचार करावा लागेल.

खरेतर, नरेंद्र पाटील हे भाजपमधून निवडणूक लढवणार होते. भाजपने तशी तयारीही केली होती. मात्र, शिवसेनेने हा मतदारसंघ सोडण्यास नकार दिल्याने अखेर युतीचा उमेदवार म्हणून त्यांना शिवसेनेतून लढवूया, असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चेतून पुढे आल्याचे सांगितले जाते. वास्तविक, उदयनराजेंची राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच भाजपने या मतदारसंघातील आपल्या हालचालींना खऱ्या अर्थाने वेग दिला आहे. उदयनराजेंबाबत राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आमदारांमध्ये असलेला विरोध आता मावळला आहे. सर्वांनी उदयनराजे यांचे काम करण्याचा निर्णय एकत्रित मेळाव्यात घेतला आहे.

उदयनराजेंनीही राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना निवडून आणण्याची जबाबदारी जाहीरपणे आपल्या शिरावर घेतली आहे. या साऱ्या घडामोडी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची डोकेदुखी वाढविणार हे लक्षात घेऊनच युतीचा तगडा उमेदवार लोकसभेसाठी असायलाच हवा, असे प्रयत्न सुरू झालेत. भाजपने गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघात चांगली बांधणी केली आहे. काही विधानसभा मतदारसंघांत ज्या मंडळींना भाजपने ताकद दिली आहे, त्यांची आणि मूळ शिवसैनिकांची एकत्रित मोट बांधली गेली, तर त्याचा लाभ युतीच्या उमेदवाराला होऊ शकतो आणि तसं काही शक्‍य झालं तरच या लोकसभा निवडणुकीचा फायदा विधानसभेला घेता येण्याच्या शक्‍यता निर्माण होतील. त्यामुळे युतीच्या या मंडळींपुढे एकदिलाने काम करण्याशिवाय सध्या तरी कोणताच पर्याय उभा असल्याचे दिसत नाही.

राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना निवडून आणणार, अशी घोषणा उदयनराजे यांनी केल्यामुळे आता शंभूराज देसाई यांच्यासारख्या नेत्यांना या लोकसभा निवडणुकीत जीवाचे रान करावे लागेल. नुकतेच भाजपवासी झालेले मदन भोसले यांना मात्र या निवडणुकीत सक्रिय ठेवावे लागेल. ‘माझी परीक्षा अजून दूर आहे,’ या भूमिकेत जर ते वावरले तर ते भाजपला हानिकारक ठरू शकते.

या सर्व परिस्थितीत युती किती एकसंधपणे निवडणुकीला सामोरी जाते, यावरच त्यांची गणिते अवलंबून आहेत. नरेंद्र पाटील यांना उमेदवारी देताना नुकतेच शिवबंधनात अडकलेले पुरुषोत्तम जाधव यांच काय करायचं, त्यांना शिवसेनेकडून थांबवलं जाणार का आणि ते थांबणार का हे प्रश्‍न अजून तरी अनुत्तरित आहेत. ते कसे सोडवले जातात, हेही पाहावं लागेल. 

या मतदारसंघातील पाटण, सातारा, जावळी या तालुक्‍यांतील माथाडी कामगारांची मते, युतीची विशेषतः भाजपची ताकद, नव्याने निर्माण झालेला मोदी वर्ग आणि उदयनराजेंबाबत काही प्रमाणात असलेली नाराजी  या नरेंद्र पाटील यांच्या जमेच्या बाजू असतील. उदयनराजेंच्या दृष्टीने त्यांचे स्वतःचे असलेले वलय, राष्ट्रवादीची ताकद आणि युवा मतदारांतील त्यांची लोकप्रियता या बाबी महत्त्वपूर्ण ठरतात.

सद्यःस्थिती ही अशी असली तरी येत्या २४ तारखेला उमेदवार जाहीर झाल्यानंतरच निवडणुकीचे वारे कोणत्या दिशेने वाहणार हे स्पष्ट होईल. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघाचा निकाल जनता कसा लावणार हे पाहण्यासाठी थोडं थांबावं लागणार आहे. तोपर्यंत पुलाखालून किती आणि कसं पाणी जाणार हे पाहणं मात्र रंजक ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT