NCP
NCP 
पश्चिम महाराष्ट्र

चर्चा तर होणारच...

सकाळवृत्तसेवा
'राष्ट्रवादी'च्या दोन्ही काकांचे काय?
नगर - लोकसभेच्या नगर दक्षिणच्या जागेचे त्रांगडे अजून काही संपत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील बैठकीत ही जागा "राष्ट्रवादी'च लढविणार हे ठासून सांगितले असताना, इकडे कॉंग्रेसचे नेते मात्र आघाडीकडून उमेदवारी मिळणारच आहे, अशा अविर्भावात तयारीला लागले आहे. त्यामुळे "राष्ट्रवादी'चे नेते द्विधा मनस्थितीत आहेत. विशेषतः विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप (अरुणकाका) यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता, तसेच "राष्ट्रवादी'चे सरचिटणीस ऍड. प्रताप ढाकणे (प्रतापकाका) यांचीही उमेदवारीसाठी इच्छा अधुरी राहण्याची शक्‍यता आहे.

पक्षाने आदेश दिल्यास पुन्हा लढू - शिवराज
लातूर : "मला कॉंग्रेसने भरपूर दिले आहे. मी कधीच काही मागितले नाही. मला ते मिळत गेले. आता अपेक्षा ठेवणे बरोबर नाही; पण पक्षाने आदेश दिल्यास मात्र निवडणूक लढवावी लागेल. निवडणूक लढवली नाही तर चांगल्या काळात निवडणूक लढवली अन्‌ परिस्थिती चांगली नाही, अशा काळात मात्र पळून गेले, असे बोलले जाईल,' असे स्पष्ट मत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

आठवले - भुजबळांची जुगलबंदी
लासलगाव : आगामी 2019 च्या निवडणुकीचा सध्या सराव सुरू आहे. मी व मोदी चांगले बॅटसमन असून चौकार, षट्‌कार ठोकतो, असे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगताच "आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. आम्ही बॅटसमनला बाद करतो,' असे उत्तर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. या जुगलबंदीने उपस्थितांमध्ये चांगलीच खसखस पिकली. येथील महावीर महाविद्यालयाच्या इमारतीच्या उद्‌घाटन कार्यक्रमात हे दोघेही नेते प्रमुख पाहुणे होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT