multipurpose hall.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

वाळवा तालुक्‍यात मंगल कार्यालयांना कोट्यवधीचा फटका

दिलीप क्षीरसागर

कामेरी (सांगली)- वाळवा तालुक्यातील येलूर,कामेरी, वाघवाडी इस्लामपूर,पेठ कासेगांव व आष्टा या परिसरात असणाऱ्या 50 हून अधिक मंगल कार्यालयांना कोरोणामुळे सुमारे दोन कोटीचा आर्थिक फटका बसला आहे. लग्नासाठी मोजक्याचं मंडळीची उपस्थिती अट शासनाने घातल्याने अनेकांनी मंगल कार्यालयाकडे फिरवली पाठ आहे.

विवाह समारंभ म्हटले की लोकांच्या डोळ्यासमोर उभे राहते ते मंगल कार्यालय काहीजण जागेच अडचणीमुळे विवाहसमारंभ मंगल कार्यालयात घेतात तर काहीजण आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी मोठ्या थाटामाटात आपल्या मुला मुलींचा विवाह करतात ग्रामीण भागातील लोकांना ही आता मंगल कार्यालय ची ओढ लागली आहे अनेक जर लाखो रुपयांचे कर्ज घेऊन आपल्या मुला- मुलींचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न करत आहेत वाळवा तालुक्यातील येलूर ,कामेरी ,वाघवाडी ,पेठ, कासेगाव, इस्लामपूर, अदि परिसरात लहान व मोठी 50 हून अधिक मंगल कार्यालये व हॉल आहेत.

मार्च एप्रिल मे जून हा कालावधी विवाह पर्वणीचा होता . या कालावधीत विवाह ,साखरपुडा, या साठीचे मोठे मूहर्त होते मात्र नेमक्या याच कालावधीमध्ये कोरोनाने थैमान घातले . सर्वत्र लाॅकडाऊन झाले. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणावर बंधने आली त्यामुळे विवाह, साखरपुडा, वाढदिवस, या समारंभासाठी मंगल कार्यालये बंद झाली आता या मंगल कार्यालयात लग्न समारंभ करू शकता मात्र त्यासाठी भडजी ,आचारी ,वधू-वर यांच्यासह पन्नास लोकांच्या उपस्थितीची अट घालण्यात आली आहे . मंगल कार्यालय मालकांनी येणार्‍या लोकांची काळजी घेण्याबाबत सूचित केले आहे सॅनीटायझर ,मास्क, याचा वापर याचबरोबर सोशल डिस्टन्स राखणे ही जबाबदारी यांच्यावर आहे. 

जरी ही संख्या कमी असली तरी मंगल कार्यालय कमी भाड्यात देणे मंगल कार्यालय मालकांना परवडणारे नाही या मंगल कार्यालयात असणारे स्वच्छता कामगार, सजावट करणारे कर्मचारी, स्वयंपाकी, या सर्व कामगारांचा पगार कार्यालय मालकाला द्यावा लागतो सध्या ही मंगल कार्यालय बंद असले तरी कर्मचाऱ्यांचा पगार द्यावा लागतो आहे . काही मंगल कार्य मंगल कार्यालय व्यवसायिकांनी बँकेची कर्ज काढून लाखो रुपये खर्च करून ही मंगल कार्यालये थाटली आहेत मात्र गेली दोन महिने मंगल कार्यालयाकडे अनेकांनी पाठ फिरवल्याने हे व्यवसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत . दोन अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये दोन कोटीहून अधिक फटका या व्यावसायिकांना बसला आहे.

मुलाला मुलगी मिळाली .मुलगीला मुलगा मिळाला. प्रश्न मिटला. आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा लोकांनीही लग्ना समारंभासाठी आवाढव्य खर्च न करता समाज हितासाठी करावा. आम्ही माणुसकीचे नाते या माध्यमातून जवळ जवळ साडेअठरा लाख रुपये खर्च करून लोकांना मदत केली आहे. सध्याची परिस्थितीच वाईट आहे त्यामुळे मंगल कार्यालयाना फटका सहन करावा लागतो आहे.

- सर्जेराव यादव, उद्योगपती सर्जेराव यादव मल्टीपर्पज हॉल इस्लापूर

.................

यावर्षीचा लग्नसराईचा मार्च ते जून सिजन वाया गेला आहे अनेकांनी तारखा बुक केल्या त्या .कोरोणाच्या पार्श्वभूमीवर रद्द केल्या त्याचा आर्थिक फटका सर्वांना बसला आहे.शासनाने आता 50 लोकांच्या उपस्थितीचा विवाह सोहळा पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे तो चांगला आहे. घरच्या पेक्षा मंगल कार्यालयात कमी लोकांत चांगले लग्न होईल आम्हीही येणाऱ्या पाहुण्यांची चांगली काळजी घेऊ सॅनीटायझर, मास्क, , सोशल डिस्टनसी पाळून भोजन व्यवस्था करू.

- संतोष पाटील, उद्योजक साई मंगलमय कार्यालय येलूर. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT