farmer loss 
पश्चिम महाराष्ट्र

Video : तिकडे देव कोंडला अन इकडे फुलांनी घेतलं गाडून

सुनील नवले

श्रीरामपूर : लाॅकडाउनमुळे राज्यासह देशभरातील विविध धार्मिक स्थळे, विविध मंदिरांना कुलूप लागले आहे. मंदिरातील पूजा-आरत्या साध्या पद्धतीने सुरु आहे. पूजेतही फुलांचा वापर केला जात नाही. त्याचा परिणाम फूल बाजारावर झाला आहे. फुलांना ग्राहक नसल्याने फुलशेती अडचणी आहे.

शेतमालांसह फुलबाजार ठप्प असल्याने व्यापाराचे चक्र कोलमडले आहे. सर्वत्र मंदिर बंद असल्याने धार्मिक उत्सव सोहळे थांबले आहेत. सध्या बाजारपेठातील फुलांची मागणी थांबल्याने फुल उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. तालुक्यातील खंडाळा येथील सुजित डेंगळे या तरुण शेतकऱ्याने यंदा आपल्या शेतात भरउन्हाळ्यात सुमारे १५ एकर क्षेत्रावर झेंडू फुलांची बाग फुलवली. परंतु त्यांची फुलबाग यंदा लाॅकडाऊनच्या कचाट्यात सापडली आहे. डेंगळे यांच्यासह तालुक्यातील अनेक शेतकरी फुलशेतीकडे मोठ्या आशेने वळाली. आणि फसल्याचे सांगतात.

फुलांचा बाजार ठप्प

डेंगळे यांनी झेंडूच्या शेतीसाठी मशागत करुन लाखो रुपयांचा खर्च केला. त्यासाठी त्यांना कुटुंबातील अन्य सदस्यांची साथ मिळाली. मेहनतीच्या जोरावर फुलवलेली झेंडुची बाग आज कोरोनाच्या वैश्विक संकटात उपटुन टाकण्याची वेळ त्यांच्यावर ओढावली आहे. सध्या त्यांच्या झेंडूच्या बागेत उत्तम प्रतीची फुले तयार झाली अाहेत. फुलांना ग्राहक नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे. सर्वच मंदीर बंद असल्याने फुलांचा बाजार ठप्प आहे. जिल्हाबंदीमुळे फुलांची वाहतूक होत नाही. अखेर करायचे तरी काय, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे डेंगळे यांनी आता फुलांची बाग तोडून टाकण्यास सुरुवात केली आहे. 

शेतकरी अडचणीत

तालुक्यातील फुलासाठी शिर्डीसह मुंबई व जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळावरील बाजारपेठ आहे. खंडाळा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी २५ ते ३० एकर क्षेत्रावर झेंडूची लागवड केली आहे. लाॅकडाऊनमुळे फुलशेती अडचणीत आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असल्याचे महेश मरकडे, सुनील ढोकचौळे, संदीप ढोकचौळे, राहुल शिंगोटे, महेश ढोकचौळे, राजेश ढोकचौळे, शशिकांत डेंगळे, अक्षय डेंगळे, प्रताप ढोकचौळे, जनार्दन डेंगळे या शेतक ऱ्यांनी सांगितले. प्रशासनाने फुलशेतीचे पंचनामे करून तात्काळ भरपाई जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

रूपयाचेही उत्पन्न नाही

झेंडूच्या बागेसाठी ६० ते ७० हजार रुपये एकरी खर्च झाला आहे. यंदा खर्च करुन एक रुपयाचे उत्पन्न मिळाले नाही. लाॅकडाउननंतर फुलांची प्रत घसरणार आहे. त्यामुळे फुलांची झाडे तोडून टाकण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्याय नाही. सरकारने आता फुलशेतीसाठी आर्थिक मदत जाहीर करुन शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीतून बाहेर काढावे.

- सुजित डेंगळे, फुल उत्पादक शेतकरी, (खंडाळा, श्रीरामपूर)

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Full Speech : मराठी, मुंबई, महाराष्ट्र अन् बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा : राज ठाकरेंचं 25 मिनिटांचं प्रचंड आक्रमक भाषण

Raj Thackeray : ''ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडियम शिकतात'' म्हणणाऱ्या फडणवीसांना राज ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले, ''मी हिब्रूत शिकेन पण...''

Latest Maharashtra News Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

SCROLL FOR NEXT