GOPICHAND.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेची लॉटरी 

सकाळवृत्तसेवा

आटपाडी (सांगली) -भाजपचे धडाडीचे युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी अखेर लॉटरी लागली आहे. विधान परिषदेसाठी भाजपने त्यांच्या चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून त्यात पडळकर यांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा, भाजपकडून बारामतीतून विधानसभा निवडणूक लढणारे पडळकर आता विधान परिषदेवर आमदार म्हणून जाणार हे निश्‍चित झाले आहे. धडाडी, जिद्द, चिकाटी आणि वक्तृत्वाचे कौशल्य या जोरावर त्यांनी मारलेली धडाडी लक्षवेधी मानली जातेय. 


भाजपचे भविष्यातील राजकारण डोळ्यासमोर ठेवून युवा नेतृत्वाला पुढे आणण्याचे धोरण आखले आहे. त्यामुळे विधान परिषदेसाठी गोपीचंद पडळकर यांचे नाव आघाडीवर होते. ते "रासप'मधून भाजपात आले. लोकसभेला उमेदवारी न मिळाल्यामुळे ते वंचित बहुजन आघाडीतून लढले. त्यांनी तब्बल तीन लाखाहून अधिक मते घेतली. त्यानंतर पुन्हा स्वगृही भाजपमध्ये परतले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मर्जी असल्याने त्यांच्या सूचनेनुसारच त्यांनी विधानसभेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याविरोधात बारामतीमधून लढत दिली. बारामतीत त्यांचा पराभव दिसत असतानाही वरिष्ठांचा आदेश आणि भविष्यातील वाटचाल समोर ठेवून मैदानात उतरले. 

पडळकर यांचे संघटन राज्यभर आहे. तसेच बहुजन आणि धनगर समाजाचे सध्या ते लोकप्रिय नेते आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने भाजपच्या वरिष्ठांनी पडळकर यांच्या नावाला विधान परिषदेसाठी सहमती दिल्याचे सांगितले जात आहे. भाजपमधून गोपीचंद पडळकर यांचे नावावर विधान परिषदेसाठी शिक्कामोर्तब झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT