Madan Patil Advise To Jayant Patil On Finance Minister Post 
पश्चिम महाराष्ट्र

"जयंतराव, अर्थमंत्री होऊ नका', "या' नेत्याने केली होती सूचना 

सकाळ वृत्तसेवा

सांगली - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या सोपवण्यात आल्या आहेत. ते अर्थमंत्री झाले आहेत. याआधी त्यांनी तब्बल नऊ वर्षे अर्थमंत्रीपद भूषवले आहे. आघाडी सरकारच्या काळात ते दीर्घकाळ राज्याचा आर्थिक गाडा सांभाळत होते. त्याआधी ते ग्रामविकासमंत्री होते आणि त्यानंतर गृह आणि पुन्हा ग्रामविकास अशी खाती त्यांनी सांभाळली. आता दहाव्यांदा ते अर्थसंकल्प मांडून नवा विक्रम स्थापन करतील. 

परंतू, जयंतरावांनी अर्थमंत्री होऊ नये, त्यांनी दुसरं ताकदीचं खातं घ्यावं, अशी सूचना त्यांच्या एकेकाळच्या कट्टर राजकीय विरोधकाने केली होती. त्या विरोधकाचं नाव आहे, दिवंगत मदन विश्‍वनाथ पाटील अर्थात सांगलीचे माजी मंत्री मदनभाऊ पाटील. मदनभाऊ आणि जयंतराव हे कट्टर राजकीय विरोधक. राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळी जयंतराव, आर. आर. पाटील यांच्यानंतर विष्णूअण्णा पाटील हे वसंतदादा पाटील पुतणे राष्ट्रवादीत गेले. त्यामुळे वडिलांसोबत मदनभाऊंनाही राष्ट्रवादीत जावे लागले होते.

मदन - जयंत राजकीय संघर्ष

मदन पाटील हे एकेकाळी जयंत आणि आर. आर. यांचे नेते म्हणून काम करत होते. त्यांचा जिल्ह्याच्या राजकारणात मोठा वट होता. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंड केले आणि अपक्ष आमदार होत पुढे कॉंग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्विकारले. त्यानंतर मदन - जयंत असा राजकीय संघर्ष धुमसत राहिला. इतका की मदन पाटील यांचे राजकीय करिअर संपवण्याचा विडाच जयंतरावांनी उचलला होता. त्यात त्यांना अनेकदा यशही आले. 

पुन्हा अर्थमंत्री होऊ नका

मदन पाटील यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. त्याआधी एक वर्षभरच मदन पाटील आणि जयंत पाटील यांच्यात समझोता झाला होता. दोघेही एक झाले होते. सांगली जिल्ह्यासाठी हे धक्कादायक होते. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत दोन्ही पाटील एकत्र आले. त्यानंतर मदनभाऊ आणि जयंतरावांमध्ये सख्य निर्माण झाले होते, मात्र दुर्दैवाने मदनभाऊ यांचे आकस्मित निधन झाले. नव्या राजकीय मैत्रीपर्वाची सुरवात होण्याआधीच अखेर झाली. मदनभाऊंच्या अंत्यसंस्कारावेळी जयंतरावांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. जयंतराव म्हणाले होते, की ""मदनभाऊ मला नेहमी म्हणायचे, "कसलं खातं घेऊन बसलाय. आता पुन्हा अर्थमंत्री होऊ नका. काहीतरी ताकदीचं आणि कामाचं खातं घ्या.'' योगायोगाने मदनभाऊंच्या या सूचनेनंतर काही काळातच जयंतरावांकडे गृहखाते आले होते. आता ते पुन्हा एकदा अर्थमंत्री झाले आहेत. त्यामुळे सांगलीकरांना मदनभाऊंची ती सूचना पुन्हा आठवते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT