बळीराजा हुंकार यात्रेत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष Sakal
पश्चिम महाराष्ट्र

महाविकास आघाडीचा दळभद्री कारभार ; राजू शेट्टींची बोचरी टीका

देवराष्ट्रे येथून हुंकार बळीराजा यात्रेचा प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

देवराष्ट्रे : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे  स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हुंकार बळीराजा यात्रेचा प्रारंभ करण्यात आला तसेच देवराष्ट्रे येथे शाखा उद्घाटन करण्यात आले. महाविकास आघाडीचा दळभद्री कारभार आहे, अशी सरकारवर टिका स्वाभिमानी  शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यानी केली. ते हुंकार यात्रेत बोलत होते. जिल्हा अध्यक्ष महेश खराडे, रामदास महिंद, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा, राज्यविज अभ्यासक श्रीदास होनमाने उपस्थित होते.

राजु शेट्टी म्हणाले की, आम्ही काय बैल आहोत का या भाषेत राज्यकर्त्याना सुनावले. शेतकऱ्याना 8 तास विज व इतराना 24 तास विज असा दुजाभाव सरकार करीत आहे. महाराष्ट्रात विज दर जादा इतर राज्यात कमी तरी सरकारने याचा अभ्यास करावा.महाविकास आघाडीचा दळभद्री कारभार आहे. यशवंतरावांचे खरे वारसदार आम्ही आहोत त्यांच्या विचार आम्ही जपत आहोत.शरद पवार कारखानदारांचे नेते आहेत. कृषिमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हित जपले नाही. महाविकास आघाडी दळभद्री कारभार करीत आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण जपले जात नाही. शेतकऱ्यांना दिवसा विज दिली जात नाही. रात्रीची विज पुरवठा केला जात आहे. विज बिल अव्वाच्या सव्वा दिली जात आहेत. महाराष्ट्रात विजेचे दर जादा आहेत. इतर राज्यात विजेचे दर कमी आहेत. सरकारने याचा अभ्यास करावा. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुंबई, दिल्लीत बसलेले सरकार लक्ष देत नाही. दिवसा विज मिळण्यासाठी व शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी ग्रामसभेत ठराव घ्या. आजच्या घडिला सरकार सहा टक्के शेतमाल खरेदी करीत आहे.इतर माल बाजारात विक्री केला जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला कोर्टात खेचुन तोंडावर पाडणार आहे.आणि येणारा हंगाम शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी दिली नाही तर कारखाने सुरु करू देणार नाही असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले.यावेळी बाबसो महिंद, भीमराव होनमाने आदि मान्यवर मोठ्या संख्येने शेतकरी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT