पश्चिम महाराष्ट्र

Coronavirus : घाेड्यांवर आली उपासमारीची वेळ

सकाळ वृत्तसेवा

महाबळेश्वर (जि. सातारा) : कोरोनाचा फटका शहरातील सर्वच घटकांना बसत असून, यातून घोडे व्यावसायिकसुध्दा सुटले नाहीत. हातावर पोट असलेल्या घोडे व्यावसायिकांची व त्यांच्या घोड्यांची आता उपासमार होत आहे. या कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शासनाने घोड्यांच्या रोजच्या खुराकाची सोय करावी, अशी मागणी महाबळेश्वर येथील घोडे व्यावसायिकांनी केली असून या मागणीचे निवेदन त्यांनी तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांना दिले आहे.

महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ असून येथील प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये घोडसवारीचा समावेश होतो. ब्रिटिश काळापासून येथे अनेक स्थानिक लोक या घोडे व्यवसायावर अवलंबून आहेत. येथे साधारणपणे दीडशे घोडे व्यावसायिक आहेत. या घोड्यांना रोज साधारण 250 रुपयांचा खुराक लागतो. यामध्ये कडबाकुट्टी व भुसा यांचा समावेश होतो. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने येथील घोडे व्यावसायिकांची उपासमार सुरू झालेली आहे.

आतापर्यंत त्यांच्याकडे खुराक होता. परंतु, आता फक्त दोन ते तीन दिवस पुरेल एवढा खुराक शिल्लक राहिला असल्यामुळे घोडे व्यावसायिकांपुढे घोड्यांच्या उपजीविकेचा प्रश्न उभा राहिला आहे. यासाठी शासनाने निदान घोडयांच्या खुराकाची सोय करावी, अशी मागणी येथील घोडे व्यावसायिकांनी निवेदनाव्दारे केली आहे. तहसीलदार सुषमा चौधरी- पाटील यांनी हे निवेदन स्वीकारले असून निवेदन देण्यासाठी येथील हॉर्स ऍन्ड पोनी असोसिएशनचे अध्यक्ष जावेद खारखंडे, बी. आय. डांगे, ताजू बढाणे व अनिस बेपारी हे उपस्थित होते. 

गावातील माणुसकी आटली : २२ तासानंतरही मृतदेह जागेवरच; अखेर ग्रामसेवकांनी दिला भडाग्नी

महाबळेश्वर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कोरोना प्रतिबंध आपत्ती व्यवस्थापन चालु असल्याने जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार जिल्हयात सर्वत्र संचारबंदी लागु करण्यात आली आहे. या संचारबंदीचे उल्लंघन करून मोकाट फिरणाऱ्या तिघांना त्यांच्या दुचाकी वाहनासह पोलिसांनी ताब्यात घेवुन त्यांचेवर गुन्हा दाखल केला आहे.
 
कोरोनाचे भयंकर संकट उभे ठाकले असतानाही मोठया प्रमाणावर संचारबंदी मोडुन अनेक बेजबाबदार नागरीक मोकाट फिरताना दिसुन येत आहेत. अशा लोकांवर पोलिसांनी अंकुश लावावा अशी मागणी केली जात होती. या मागणीची दखल महाबळेश्वर पोलिसांनी घेतली असुन अशा मोकाट फिरणाऱ्यांवर पोलिसांनी नजर ठेवण्यास सुरूवात केली आहे. अशीच शहरात गस्त सुरू असताना गाव सोडुन कोकणात जाताना तिघांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

हेही वाचा : व्हॉट्‌सऍप ग्रुप ऍडमिन आहात ? काळजी घ्या, अन्यथा 

संचारबंदी डावलुन तुकाराम महादेव पार्टे वय 40 रा. गुलटेकडी मार्केट, चांभारगणी बु, ता. पोलादपुर, जि रायगड, सतिश सखाराम जाधव वय 26 रा.पुणे सध्या रा. पायटा जि. रायगड, सुभाष नारायण दळवी वय 36 रा.पुणे सध्या ‌रा.पायटा, जि.रायगड या तिघां जवळ असलेल्या दुचाकीसह महाबळेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले. या तिन्ही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्हयाचा तपास पोलिस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली चालु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : SIR वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण: सर्व निर्णय एकमताने घेतले

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT