Mahan Bharat Kesari Dadu Chougule No more  
पश्चिम महाराष्ट्र

महान भारत केसरी दादू चाैगले यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - महान भारत केसरी, रुस्तम ए हिंद, ध्यानचंद पुरस्कार विजेते दादू चौगले (७३) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ‌निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

हिंद केसरी विनोद चौगले, महाराष्ट्र चॅम्पियन अमोल चौगले यांचे ते वडील होत. सायंकाळी साडे पाच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

चौगले हे मूळचे अर्जुनवाड (ता. राधानगरी) येथील. त्यांनी मोतीबाग तालमीत कुस्तीचे धडे गिरवले. १९७० ला ‘महाराष्ट्र केसरी’, १९७३ ‘रुस्तम-ए-हिंद’ व याच वर्षी ‘महान भारत केसरी’चा किताबा पटकाविला. त्यांनी १९७३ ला ऑकलंडमध्ये (न्यूझीलंड) झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. त्यांनी १०० किलो वजनी गटात फ्री स्टाइल प्रकारात हे यश मिळवले. त्यांना ध्यानचंद पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.

अल्प परिचय

राधानगरी तालुक्‍यातील अर्जुनवाडा गावात गरीब कुटुंबात दादू दत्तात्रय चौगले यांचा जन्म झाला. या दहा वर्षांच्या मुलाने गावातील तालमीत कुस्तीचे धडे गिरवत चमक दाखवायला सुरवात केली. वस्ताद भाऊ यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे एक - एक डावपेच त्यांनी आत्मसात केले आणि विविध जत्रांच्या निमित्ताने होणाऱ्या कुस्ती मैदानात कधी पाच कधी दहा तर कधी केवळ नारळावर कुस्त्या केल्या. वडील व भाऊ दोघेही पैलवान. घराण्याची कुस्ती परंपरा राखण्यासाठी दादूला मोतीबाग तालमीत घातले. तेथे बाबू बिरे या वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला. 1970 आणि 1971 दोन्ही वर्षी सलग महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आणि दादू चौगलेंचे नाव चारी मुलखात झाले. त्यानंतर दोन वर्षांनी 73-74 मध्ये रुस्तम-ए-हिंद आणि महान भारत केसरी किताब पटकावला. इतकेच नव्हे तर न्यूझीलंड येथे झालेल्या स्पर्धेत पैलवान दादू चौगले यांनी मॅटवरील कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. मोतीबाग तालमीत तयार झालेले दादू चौगले पुढे याच तालमीत वस्ताद झाले. पठ्ठ्याला विविध डावपेच शिकवणे, त्यांचा सराव घेणे, त्यांचा खुराक निश्‍चित करणे ही जबाबदारी त्यांनी पेलली. विजार-शर्ट असा पेहराव असलेल्या दादू चौगले यांनी मुलगा विनोदलाही मल्ल केले. त्यानेही दोनदा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. मोतीबाग तालमीत शंभर मल्ल आहेत. कुराडे, ढेळे, संग्राम पाटील, विजय पाटील हे मल्ल त्यांनी घडविले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: भारतीय खेळाडूंना पाकिस्तानविरुद्ध जबरदस्तीने खेळावं लागलं, BCCI...; दिग्गज खेळाडूचा खळबळजनक दावा

Akola News : बंजारा व लभाण समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देवू नका; अकोल्यात बिरसा क्रांती दलतर्फे जिल्हा कचेरीवर भव्य मोर्चा

Latest Marathi News Updates : "हा तकलादू जीआर सुप्रीम कोर्टात टिकणार नाही"- सुजात आंबेडकर

Kej Heavy Rain : केज तालुक्यात पावसाचा हाहाकार! नदी-नाल्यांच्या पाण्याने केले उग्र स्वरूप धारण, केकाणवाडी पाझर तलाव फुटला

Supreme Court warn Election Commission : बिहार 'SIR'वरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला इशारा अन् म्हटलं...

SCROLL FOR NEXT