पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्रासह अन्य राज्यातून कर्नाटकात 'नो एंट्री'

कोगनोळी तपासणी नाक्यावरून वाहने परत; अत्यावश्यक वाहनांना प्रवेश

अनिल पाटील

कोगनोळी : कर्नाटकात (karnatak) वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या (covid-19 patients) पार्श्वभूमीवर 10 ते 24 मे अखेर राज्यात संपूर्ण लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील राष्ट्रीय महामार्गावर (national highway) असणाऱ्या कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावरून (kognoli check post) महाराष्ट्र व अन्य राज्यातून येणाऱ्या चारचाकी वाहनधारकांना परत पाठवून देण्यात येत आहे. रविवारी (9) सकाळी अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे महाराष्ट्र व इतर राज्यातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडाली. उद्यापासून केवळ अत्यावश्यक (emergency service)वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे.

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरून महाराष्ट्र (maharashtra) व इतर राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना आपले आरटीपीसीआर (RTPCR report) रिपोर्ट दाखवून कर्नाटकात प्रवेश दिला जात होता. पण कर्नाटक शासनाने (governemnt of karnataka) 10 ते 24 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केला असल्याने महाराष्ट्र व इतर राज्यातून अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही कर्नाटकात प्रवेश दिला जाणार नाही. त्याची अंमलबजावणी रविवार (9) पासून सुरू झाली.

कर्नाटक शासनाने जाहीर केलेला लॉकडाऊन १०० टक्के यशस्वी करण्यासाठी पोलिसांनी (karnatak police) शर्तीचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे नागरिकांची मोठी पंचाईत झाली. कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी प्रवाशांनी येथे उपस्थित अधिकाऱ्यांना विनंती सुरू केली होती. सीमा तपासणी नाक्यावरून अत्यावश्यकमधून वैद्यकीय सेवेला मुभा दिली आहे. त्यांची सर्व माहिती नोंद करूनच त्यांना कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे.

पोलिस बंदोबस्तासह कर्मचाऱ्यांची नियुक्ती

कोगनोळी येथील सीमा तपासणी नाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त तीन शिफ्टमध्ये सुरू आहे. येथे 3 उपनिरीक्षक, 3 सहाय्यक उपनिरीक्षक, 50 पोलिस कर्मचारी व होमगार्ड तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक एस. एम. कारजोळ यांनी दिली. तसेच 9 शिक्षक, 5 आशा कार्यकर्त्या, वैद्यकीय सेविका, डॉक्टर यांची या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT