पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात मए समितीच्या मेळाव्यावर कर्नाटक पोलिसांकडून दगडफेक

डेपो परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

डेपो परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

बेळगाव : कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्याला आडकाठी घालण्याचा प्रयत्न कर्नाटक पोलिसांकडून सुरू झाला आहे. मंडप घेण्यासाठी परवानगी घेण्यात आलेली नाही असे कारण सांगत व्हॅक्सिन डेपो परिसरात घालण्यात आलेला मंडप काढण्यासाठी पोलिसांकडून दगडफेक केली जात आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार मोठ्या संख्येने जमलेल्या समिती कार्यकर्त्यांतून केला जात आहे.

मराठी भाषिकांचा विरोध असतानाही कर्नाटक सरकारकडून गेल्या काही वर्षांपासून बेळगावात अधिवेशन घेतले जात आहे. त्याच्याविरोधात अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे भव्य मेळाव्याचे आयोजन केले जाते. मेळाव्याला परवानगी नाही असे सांगत रविवार पासूनच पोलिसांची मोठ्या प्रमाणात दादागिरी सुरू आहे. डेपो परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ठीकठिकाणी कार्यकर्त्यांची अडवणूक केली जात असून सकाळपासूनच कार्यकर्ते मोठ्या संख्येने मेळाव्यासाठी दाखल होऊ लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Spain Crisis : हे झॉम्बी नाहीत तर माणसं... फोटो हादरवणारे! समुद्रातून पोहत लोक स्पेनमध्ये का पोहोचले? मोरोक्कोतून का उडाली झुंबड?

Afroz Jhari Disqualified : महाविकास आघाडीला मोठा धक्का! काँग्रेस नगरसेविका अफरोज झारींचे सदस्यत्व रद्द; महायुतीची पकड मजबूत होणार?

Gorakhpur Murder Case : चिमुकल्या वैभवच्या हत्येप्रकरणी आरोपीचे कुटुंबिय अटकेत, घरावर चालणार बुलडोझर; फॉरेंसिक टीम करणार 'सीन रीक्रिएट'

Maharashtra Flood News: पहिल्याच पावसात कंधार-नरसी मार्ग पाण्यात; बांधकाम विभागाविरोधात ग्रामस्थ करणार जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन

उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्याच्या घरी आणि कार्यालयात पेपर बंद, खर्च कमी करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; वृत्तपत्र विक्रेत्यांचा विरोध

SCROLL FOR NEXT