Maharashtra-Karnataka border Four girls of Belgaum drowned in lake esakal
पश्चिम महाराष्ट्र

Belgaum News : बेळगावच्या चार युवतींचा तलावात बुडून मृत्यू

किटवाड प्रकल्पावर सहलीवेळी दुर्घटना

सकाळ वृत्तसेवा

चंदगड : महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील किटवाड (ता. चंदगड) लघुपाटबंधारे प्रकल्पावर सहलीसाठी आलेल्या बेळगावच्या चार विद्यार्थिनींवर काळाने घाला घातला. रुक्सार युसूफ बित्ती, कुदूसिया हसन पटेल दोरा, तस्मीया अशफाक बिस्ती (तिघीही रा. झटपट कॉलनी, अनगोळ) व अस्मिया महम्मदगौस मुजावर (रा. उज्जवनगर, पाचवा क्रॉस) अशी त्यांची नावे आहेत. आज दुपारी ही दुर्घटना घडली. या संदर्भात घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी बेळगाव येथील माळी गल्लीतील आयेशा आफा या अरेबिक कोचिंग क्लासच्या विद्यार्थिनी किटवाड धरणावर सहलीसाठी आल्या होत्या.

प्रकल्पाच्या सांडव्याजवळ एका विद्यार्थिनीचा तोल जाऊन ती पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी इतर चौघींनी पाठोपाठ पाण्यात उड्या मारल्या. त्या सर्वजणी बुडू लागल्या. त्यांची अवस्था बघून इतर विद्यार्थिनींनी आरडाओरड केली. प्रकल्पाजवळील ग्रामस्थांनी तातडीने तिकडे धाव घेतली. काही तरुणांनी या पाचही युवती पाण्याबाहेर काढले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. पोलिस निरीक्षक संतोष घोळवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पाचही युवतींना बेळगाव येथील रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले; मात्र त्यापैकी चौघींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. एका विद्यार्थिनीवर उपचार सुरू आहेत.

मदत मिळण्यास उशीर...
बेळगाव येथील कोचिंग क्लासच्या विद्यार्थिनी व त्यांच्या शिक्षिका यांची ही सहल होती. घटना घडल्यानंतर मदत मिळेपर्यंत उशीर झाल्याने चौघींना प्राण गमवावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT