Sambhaji Raje sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sambhaji Raje : सीमाभागातील `मराठी`साठी महाराष्ट्राकडे पाठपुरावा करणार : संभाजारीजे छत्रपती

अनेक वर्षानंतरही सीमावासिय महाराष्ट्रात येऊ शकलेले नाहीत, याची आपल्याला खंत वाटते

सकाळ वृत्तसेवा

निपाणी, कारदगा : अनेक वर्षानंतरही सीमावासिय महाराष्ट्रात येऊ शकलेले नाहीत, याची आपल्याला खंत वाटते. मात्र कारदगासह सीमाभागात साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषा, संस्कृती आणि मराठीपण जिवंत ठेवण्यासाठी जे उपक्रम चालतात, त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून नियमित मदत मिळवून देण्यासाठी आपण राज्य शासनाकडे मागणी व पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन माजी राज्यसभा सदस्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

रविवारी कारदगा येथील साहित्य विकास मंडळाकडून आयोजित रौप्यमहोत्सवी ग्रामीण साहित्य संमेलनात ते उदघाटक म्हणून बोलत बोलत होते. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, खरेतर साहित्य संमेलने ही साहित्य क्षेत्रातील आणि साहित्य रसिकांसाठी मेजवानी असते. साहित्य संमेलन हे राजकीय नेत्यांचे व्यासपीठ मला वाटत नसल्याने आजवर आपण कोणत्याही साहित्य समेलनाला जाणे टाळले आहे.

मात्र सीमाभागात कारदगासारख्या खेड्यात मराठी लोकांना एकत्रीत आणून मराठी संस्कृती टिकवून ठेवण्याचे कार्य अविरत सुरु असल्याची बाब अभिमानास्पद वाटली. येथील मराठी लोकांना ताकद आणि प्रोत्साहन देण्यासाठी येणे आपले कर्तव्य मानून संयोजकांच्या आग्रहाखातर उपस्थित राहिलो आहे. कारदगा परिसर आणि करवीर संस्थानचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. संमेलनानिमित्त निघालेल्या ग्रंथदिंडीसह लेझीम, दांडपट्टासारख्या खेळांना दिलेले प्राधान्य पाहून आपण भारावून गेलो. संमेलनाच्या निमित्ताने आपल्याला ग्रामीण मराठी संस्कृतीचे दर्शन घडले आहे. खालच्या पातळीवरील टीका-टिपणीमुळे हल्ली कर्नाटक, महाराष्ट्रासह सर्वत्र राजकारणाचा स्तर घसरत चालला आहे.

राजकारणात साहित्याचा अभाव असून परिवर्तनासाठी राजकीय नेते, कार्यकर्त्यांना साहित्य संमेलनांचा सहवास आवश्यक आहे. संमेलनातून निश्चितपणे सकारात्मक दिशा मिळू शकेल. कारदगा संमेलनाच्या उपक्रमासाठी करवीर संस्थानकडून लागेल ते सहकार्य आपण करू. खरेतर सीमाभागातील मराठी संस्कृती आणि मराठी सोहळ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने नियमित मदत देणे आवश्यक आहे. ते महाराष्ट्र शासनाचे आद्य कर्तव्य आहे. मात्र तसे होत नाही, याबद्दल आपण त्वरीत महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून तशी मागणी करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यानां जमलं नाही ते सामन्यात करून दाखवलं

Baramati Bypoll News: बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी भाजपचा बूथस्तरावर निर्धार, विकासकामांवर भर

Nashik Dharmantar Case: नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करा; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पोलिसांना निर्देश!

Pune Drunk and Drive News : पुण्यात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’वर कडक कारवाई; २२९ मद्यपी चालकांचे समुपदेशन, वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

SCROLL FOR NEXT