kusti.jpeg 
पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर येथे चितपट झाला. 

सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर-पेठ (ता.वाळवा) येथील श्री माणकेश्वर खंडेश्वर यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात यंदाचा महाराष्ट्र केसरी पै. हर्षद सदगीर याला न्यु मोतीबाग तालीम कोल्हापूरचा मल्ल उपमहाराष्ट्र केसरी नंदु अबदार याने घुटना डावावर चितपट केले. नंदूला 2 लाख 3 हजार 3 रुपयाचे बक्षिस देण्यात आले. 


यात्रेनिमित्त आयोजित भव्य कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी हर्षद सादगीर याची कुस्ती असल्यामुळे त्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुस्ती शौकीनांनी गर्दी केली होती. कुस्ती मैदान गर्दीने फुलून गेले होते. महाराष्ट्र केसरी हर्षद विरूद्ध उपमहाराष्ट्र केसरी नंदू यांच्यातील कुस्तीमध्ये कोण चितपट होणार? याची शौकीनांना उत्सुकता होती.

दोघांमध्ये गुरूवारी रात्री उशिरा कुस्ती लावण्यात आली. खडाखडी झाल्यानंतर दोघांनी ताकदीचा अंदाज घेतला. दहा मिनिटे दोघे मल्ल एकमेकांना आजमावत होते. अखेर दहाव्या मिनिटाला नंदूने घुटना डावावर महाराष्ट्र केसरी हर्षदला चितपट केले. 
प्रथम क्रमांकाची कुस्तीचे बक्षीस वितरण युवानेते सम्राट महाडीक, यात्रा कमेटीचे अध्यक्ष मोहनराव मदने, हिंदकेसरी संतोष वेताळ, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, जगन्नाथ माळी, दीपक कदम यांच्या हस्ते करण्यात आले. 


मैदानात अन्य कुस्त्यांमध्ये गंगावेश तालमीचा सिकंदर शेख विरूध्द आंतरराष्ट्रीय कुस्ती आखाडा पुणेचा कौतुक डफळे यांच्यात दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती लावण्यात आली. कुस्तीत कौतुक डफळे जखमी झाल्याने ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. ही कुस्ती एक लाख 3 हजार 3 रूपये बक्षिसाची होती. सतीश सूर्यवंशी भाटवडे विरूध्द शिवाजी पाटील (कोल्हापूर) यांच्यात तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती झाली. त्यामध्ये सतीश सूर्यवंशी याने विजय मिळवला. ही कुस्ती 73 हजार रूपये बक्षिसाची होती. पै.अक्षय मदने(कुंडल) विरूध्द अजय निकम(रेड) यांच्या कुस्तीत अक्षय मदने विजयी झाला. 


याव्यतिरिक्त मैदानात अतुल नायकल,संघर्ष पवार,सागर पवार,सुरज शेलार,विक्रम चव्हाण,अजय केसरे,विशाल जाधव,अनिकेत खबाले,बाजीराव माने, शुभम पाटील,अनिकेत खोत,प्रवीण जाधव,अक्षय शिंदे या मल्लानी विजय नोंदवला. यावेळी वाळवा पंचायत समितीचे गटनेते राहुल महाडीक यांनी मैदानास भेट दिली. कुस्ती प्रशिक्षक नजरुद्दीन नायकवडी,धनपाल माळी,सर्जेराव खोत,पंजाबराव पवार,यांसह कुस्ती शौकीन मोठ्या संखेने उपस्थित होते.

मैदानात सर्वच कुस्त्या चटकदार झाल्या. उत्तम बैठक व्यवस्था होती. गॅलरीची कुस्ती शौकीनांनी खचाखच गर्दीने भरली होती. कुस्त्यांचे समालोचन ईश्वरा पाटील, शहाजी चव्हाण, कृष्णात पाटील यांनी केले. यात्रा कमिटी अध्यक्ष मोहन मदने, पंच बबन शिंदे, राहुल मोरे, तानाजी चौरे, कृष्णा पवार, विश्‍वास मोहिते आदींनी संयोजन केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT