Monsoon News sakal
पश्चिम महाराष्ट्र

Monsoon News : पावसाचा दिलासा, पेरण्यांना जोर ३१ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण; सर्वाधिक सोयाबीन बियाण्याची उचल

एप्रिल व मे महिन्यात कडक उन्हाच्या झळा सोसल्यानंतर काही वळीव आणि आता दोन दिवसांत माॅन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली.

सकाळ वृत्तसेवा

चिक्कोडी : एप्रिल व मे महिन्यात कडक उन्हाच्या झळा सोसल्यानंतर काही वळीव आणि आता दोन दिवसांत माॅन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे मशागती करून पेरणीसाठी सज्ज असलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीकामाला गती दिली आहे. चिक्कोडी व निपाणी तालुक्यात ९७ हजार हेक्टर क्षेत्रात यंदा पिकांचे नियोजन असून आतापर्यंत ३१ हजार १२७ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे.

चिक्कोडी व निपाणी तालुक्यात नदीकाठावरील भागात काही शेतकऱ्यांना पावसाच्या आधीच पाणी देऊन पेरण्या केल्या आहेत. आता पाऊस दमदार झाल्याने गेल्या चार दिवसांपासून माळरानातही पेरण्यांना गती आली आहे. सर्वदूर पाऊस झाल्याने व माळरानात पाणी साचून राहिले आहे.

त्यामुळे यावेळी माळभागात पेरणीला गती आली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी पेरणी क्षेत्र अधिक राहणार असल्याचा कृषी खात्याचा अंदाज आहे. त्यानुसार प्रत्येक क्षेत्रनिहाय बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. सोयाबीन पेरणी वर्षाप्रमाणे अधिक आहे. तर माळरानात मका व इतर कडधान्यांची पिके घेण्यावर भर दिल्याचे दिसून येते.

चिक्कोडी व निपाणी तालुक्यात प्रत्येक रयत केंद्रातून बियाणे वितरण करण्यात येत आहे. त्यानुसार शेतकरी आपले शेतीचे उतारे घेऊन सवलतीच्या दरात बियाणे घेऊन जात आहेत. यावर्षी सोयाबीन बियाण्याची मागणी अधिक असल्याचे शेतकऱ्यांच्या मागणीवरून दिसत आहे. आता झालेल्या पेरणी क्षेत्रात बहुतांश सोयाबीन पेरणीचे क्षेत्र आहे.

विविध बियाण्यांचे वाटप सुरू चिक्कोडी व निपाणी तालुक्यासाठी यावर्षी सर्व प्रकारची बियाणे उपलब्ध केली आहेत. त्यानुसार सोयाबीन बियाणे ३५०० क्विंटल मागविण्यात आले असून चिक्कोडी, नागरमुन्नोळी, सदलगा, निपाणी या केंद्रातून बियाणे वितरण करण्यात येत आहे. नागरमुन्नोळी भागात सोयाबीन बियाण्याची उचल कमी आहे.

हा प्रदेश माळभागात येत असल्याने इतर बियाण्यांची येथून मागणी आहे. सोयाबीनची मागणी अधिक असली तरी मका २०० क्विंटल, मूग ८ क्विंटल, उदीड २० क्विंटल मागविले आहे. त्याचे वाटप सुरू आहे. उदीड व मका याची मागणी साधारण आहे तर मूग बियाण्याची मागणी अल्प असल्याचे कृषी खात्यातील उचलीवरून दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT