Maharashtra Politics Karnataka Conspiracy to establish government CM uddhav Thackeray belgaum
Maharashtra Politics Karnataka Conspiracy to establish government CM uddhav Thackeray belgaum esakal
पश्चिम महाराष्ट्र

कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात हालचाली; सत्तांतर घडविण्याचे षडयंत्र

महेश काशिद

बेळगाव : महाराष्ट्र राज्यातील राजकीय भूकंपामुळे कर्नाटकातील जुन्या आठवणी ताज्या झाल्या. यामुळे कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्रात सत्तांतर घडविण्याचे षडयंत्र सुरु आहे, अशी टीका कॉंग्रेस नेत्यांनी केली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे गटातर्फे बंडखोरी करण्यात आली आहे. ४० पेक्षा अधिक आमदार शिंदे गटासोबत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर झाले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार अल्पमतात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कर्नाटकातील जुन्या राजकीय घडामोडी ताज्या झाल्या आहेत. कर्नाटक राज्यात २०२०-२१ मध्ये धजद-कॉंग्रेस युतीचे सरकार होते. एच. डी. कुमारस्वामी मुख्यमंत्री असताना सरकारमधील आमदार फुटले. आमदार रमेश जारकीहोळीसह कॉंग्रेस आणि धजदमधील १७ आमदार भाजपात प्रवेश केला.

यामुळे भाजपला सत्ता मिळाली. बी. एस. येडियुराप्पा मुख्यमंत्री झाले. याधर्तीवर महाराष्ट्रामधील राजकीय घडामोडी पाहून राज्यातील विविध नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरु केल्या आहेत. ऑपरेशन ‘कमळ’ व सत्तांतर विषयावर अभिप्राय व्यक्त केला आहे. कॉंग्रेसचे माजी केपीसीसी अध्यक्ष डॉ. जी. परमेश्‍वर यांनी कर्नाटकाप्रमाणे महाराष्ट्रात राजकारण सुरु आहे, अशी टीका बंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे. ही व्यवस्था लोकशाहीला योग्य नाही. एका पक्षाला बहुमत न मिळाल्यास युती करून सरकार स्थापने स्वाभाविक. त्याला जनतेचा फारसा आक्षेप नसतो किंवा घटनेत त्याची तरतूद आहे. यानुसार शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाने मिळून सरकार स्थापन केले आहे. मात्र, काही नाराज आमदारांना हाताशी धरत गटबाजी सुरु आहे.

यामुळे कर्नाटक राज्यातील सत्तांतर नाट्य धर्तीवर महाराष्ट्रात भाजपने हालचाली सुरु केल्याचा आरोप केला आहे. तर केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनीही याविरुध्द टीका करत यास्वरुपाचे सत्तांतर योग्य नाही, असा आरोप केला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे वगळता उर्वरित आमदारांनी बंडखोरी केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पतनला अंतर्गत कुरघोड्या कारणीभूत आहे. पण, त्याचे खापर भाजपवर फोडले जात आहे. अशी प्रतिक्रिया केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी हुबळीत पत्रकारांशी बोलताना दिली आहे. तर अवजड उद्योग मंत्री मुरगेश निराणी यांनी शिवसेना व भाजप पक्षाची जुनी मैत्री आहे. निश्‍चित दोन्ही पक्ष एकत्र येऊन नवीन सरकारची स्थपना करतील, असा विश्‍वास व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT