maharashtra politics Sangola MLA sent to assembly perform comedy nana Patole criticize Shahaji patil politics
maharashtra politics Sangola MLA sent to assembly perform comedy nana Patole criticize Shahaji patil politics sakal
पश्चिम महाराष्ट्र

Nana Patole : सांगोल्याचे आमदार कॉमेडी करण्यासाठी विधानसभेत पाठवलेत का? पटोले शहाजी पाटलांवर बरसले

सकाळ वृत्तसेवा

महूद : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय लवकरच सर्वोच्च न्यायालयात होईल. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या घडामोडी जनतेला पहावयास मिळतात. सध्याचे घटनाबाह्य सरकार सत्तेवरून दूर झाल्यानंतर पुन्हा राज्यात खोके सरकारच सत्तेवर येणार नाही,असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महूद येथे बोलताना सांगितले.महूद येथील घरेलू कामगार महिलांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

सांगोला तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने महूद येथे आज घरेलू कामगार महिलांचा मेळावा घेण्यात आला.या मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बोलत होते. काकासाहेब कुलकर्णी,  विजयकुमार हत्तुरे,  महिला जिल्हाध्यक्ष शाहीन शेख, सुनीता अवघडे,  मैना बनसोडे,  जिल्हा उपाध्यक्ष रवी कांबळे, सांगोला शहराध्यक्ष तौहीद मुल्ला यावेळी प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार रामहरी रुपनवर,

जिल्हाध्यक्ष डाॅ.धवलसिंह मोहिते- पाटील,काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे,प्रदेश प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी,महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शाहीन शेख,  उपाध्यक्षा मैनाताई बनसोडे, घरेलू महिला कामगार जिल्हाध्यक्षा सुनिता अवघडे, सांगोलाा शहराध्यक्ष तोहीद मुल्ला,तालुका अध्यक्ष अभिषेक कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे,रणजीत महापुरे,अण्णासाहेब इनामदार, अण्णासाहेब शिंदे,सांगोला तालुका प्रभारी विष्णु शिंदे,मंगळवेढा तालुका अध्यक्ष प्रशांत साळे आदी उपस्थित होते. 

या मेळाव्यास मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष श्री.पटोले पुढे म्हणाले की,महाराष्ट्रासह देशातील राजकारण गढूळ बनले आहे.घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रानुसार धनिकाकडून कर रूपाने जमा झालेला पैसा सर्वसामान्यांना सुविधा पुरवण्यासाठी वापरण्यात यावा.

याच तत्त्वानुसार काँग्रेस पक्षाने गेल्या साठ वर्षात धोरण राबवून सामान्य जनतेला न्याय व सुविधा दिल्या.स्वातंत्र्यानंतरच्या काळात सुई पासून राॅकेट बनविण्या पर्यंतची प्रगती साध्य केली.सध्या मात्र जी एस टी च्या रूपाने सर्वसामान्यांच्या अन्नधान्यावरही कर लावून आमाप पैसा गोळा केला जात आहे.व हा पैसा ठराविक एक-दोन उद्योगपतींना देण्याचे पाप भाजपा सरकार करते आहे.त्यामुळेच गेल्या आठ वर्षांपूर्वी जो उद्योगपती देशात खालच्या क्रमांकावर होता,तो सध्या जगात वरच्या क्रमांकावर गेला आहे.

राज्यातील व देशातील अराजकता संपवण्यासाठी काँग्रेस हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. सांगोला तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अभिषेक कांबळे हे जनतेच्या  प्रश्नावर सातत्याने आवाज उठवत आहेत.

काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला पाहिजे असेही त्यांनी आवाहन केले.सांगोल्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तसेच या भागातील डाळिंब उत्पादकांसाठी सांगोल्यातच डाळिंब संशोधन केंद्र व्हावे यासाठी काँग्रेस पक्ष आग्रही राहील असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमात बोलताना माजी आमदार रामहरी रुपनवर म्हणाले की,काँग्रेस पक्षाने आजपर्यंत महिला कामगारांसाठी अनेक योजना दिल्या. मात्र भाजपा सरकारने या योजना बंद करण्याचे पाप केले आहे.मुळात भाजपा चा महिलां बाबतचा दृष्टिकोन अतिशय खराब आहे.देशासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या महिला खेळाडूंना भाजपाचा खासदार त्रास देत आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत ही बाब अतिशय लाजिरवाणी आहे.

जनतेच्या प्रश्नावर विकासावर न बोलता राम,हनुमान अशा धार्मिक गोष्टींवर बोलून लोकांना भावनिक करून मते मागत आहेत.या संवेदनशुन्य भाजपा सरकारला हटविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले.तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे यांनी सांगितले की,तालुक्यात तरुणांची फळी निर्माण केली असून जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही लढत आहोत.प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन अभिजीत कांबळे यांनी केले.या कार्यक्रमास महूद परिसरातील घरेलू कामगार महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कॉमेडी करण्यासाठी विधानसभेत पाठवले का? 

सांगोल्याचे दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख या भागाचा पाणी प्रश्न अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडायचे. त्यांची भाषणे ऐकून अनेक आमदार प्रश्नांची जाण कशी असावी हे शिकले.सध्या मात्र या भागाचे लोकप्रतिनिधी तालुक्याच्या एकाही प्रश्नावर विधानसभेत कधी आवाज उठवत नाहीत.जनतेचे प्रश्न बाजूला सारून खोक्याच्या मागे धावणारे या भागाचा विकास कसा करू शकतील? असा लोकप्रतिनिधी आपण काय कॉमेडी करायला पाठवला आहे का?- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Latest Marathi News Live Update : संभाजीनगरमध्ये सिलिंडर स्फोट, बालिका ठार, पाच जखमी

SCROLL FOR NEXT