पश्चिम महाराष्ट्र

हातकणंगले : मिणचेकरांवरील नाराजीमुळे काँग्रेसचे राजूबाबा आवळे विजयी | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

हातकणंगले - हायहोल्टेज लढतीमुळे सर्वाचे लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे राजूबाबा आवळे यांनी शिवसेनेचे उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर यांचा 6,770 मतांनी पराभव केला.

मतदारसंघात मिणचेकरांबाबत पसरलेली नाराजी आणि सेना भाजपच्या अंतर्गत वादामुळे काँग्रेसला विजय मिळाला. तसेच या विजयात राष्ट्रवादी बरोबरच शेतकरी संघटनेनेही भक्कम साथ दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. या विजयामुळे राजूबाबांचे अनेक वर्षाचे स्वप्न साकारले झाले. निकालानंतर त्यांच्या कार्यकर्त्यानी गुलालाची व फटाक्यांची आतिष बाजी करत जलोष साजरा केला.

निवडणूक प्रचार दरम्यान गेले पंधरा दिवस प्रचारात टोकाची इर्षां जणवत होती. हातकणंगले विधानसभा मतदार संघातून तब्बल सोळा उमेदवार रिंगाणात होते. त्यामुळे मतदारांचा अंदाज कोणालाच येत नसल्याने मोठया प्रमाणात राजकीय संभ्रमअवस्था निर्माण झाली होती. मतदाना दिवशी मोठया ईष्येने 73.10 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे आजच्या निकालाकडे सर्वाचे लक्ष लागले होते. मतमोजणी परिसरात सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यानी मोठी गर्दी केली होती.

आज सकाळी आठ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष मतमोजणीला सुरवात झाली. सुरवातीला टपाली मते स्कॅन करून घेण्यात आली. पहिल्या फेरीत जनस्वराज्यचे अशोकराव माने यांनी राजूबाबा आवळे यांच्यावर 2299 मतांची आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत ही आघाडी 911 मतांनी वाढून 3210 वर गेली. तिसऱ्या फेरीत माने यांची आघाडी 1129 मतांनी कायम राहीली. यामुळे तिसऱ्या फेरी अखेर 4339 मतांनी आघाडीवर होती.मात्र चौथ्या फेरीत ही आघाडी तोडत राजू बाबा आवळेंनी 1349 मतांची आघाडी घेतली. चौथ्या फेरीत राजूबाबांनी घेतलेली ही आघाडी 17 व्या फेरी पर्यंत कायम राहिली. फक्त सुरवातीच्या 7 फेऱ्यात जनस्वराज्यचे अशोकराव माने दुसऱ्या स्थानावर होते. 

आमदार मिणचेकर तिसऱ्या स्थानावर होते. तर आठव्या फेरीपासून सतराव्या फेरीअखेर राजूबाबा आवळे पहिल्या स्थानावर तर डॉ.मिणचेकर दुसरया स्थानावर राहीले. सतराव्या फेरी नंतर राजूबाबा आवळे यांना एकूण 73,720 मते मिळाली तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी आमदार सुजित मिणचेकर यांना 66,950 मते मिळाल्याने राजूबाबा आवळे यांचा विजय निश्चित झाला.44,562 मते घेत जनस्वराज्यचे अशोकराव माने तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

ताराराणी आघाडीचे किरण कांबळे यांनी चौथ्या क्रमांकासाठी 19,736 मते घेतली.लोकसभेच्या निवडणूकीत मिळालेल्या घवघवीत यशामुळे हवेत असलेल्या वंचित आघाडीचा फूगा फुटला असून 11,273 मतांसह वंचितचे एस.पी. कांबळे पाचव्या क्रमांकावर फेकले गेले.जनस्वराज्यने डावललया नंतरही अपक्ष म्हणून रिगणात राहिलेल्या माजी आमदार राजीव आवळे यांना मात्र अवध्या 6,711 मतावर समाधान मानावे लागले.

धैर्यशील माने नापास

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाअंतर्गत पाचही मतदारसंघात शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे या विधानसभा निवडणूकीतही धैर्यशील मानेंचा करिश्मा कायम राहील अशी अपेक्षा होती. मात्र पाचपैकी एकाही मतदार संघात शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून न आल्याने धैर्यशील माने विधानसभेच्या परिक्षेत नापास झाल्याची चर्चा राजकीय क्षेत्रांत सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

Summer Home Decor Tips: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा करुन घ्या फायदा; 'अशा' पद्धतीने करा घराचा मेकओव्हर.. सर्वजण पाहतच राहतील

SCROLL FOR NEXT