vidhansabha results 2019  
पश्चिम महाराष्ट्र

दहिवडीमध्ये झालं इतकं मतदान ; दीड वाजता येणार निकाल | Election Results 2019

सकाळवृत्त सेवा

दहिवडी : माण विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीची तयारी प्रशासनाने पुर्ण केली असून आज दुपारी दीड वाजता निकाल हाती येईल.

आज सकाळी साडेआठ वाजता नवीन शासकीय धान्य गोदामात प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात होईल. एकूण चौदा टेबलवर मतमोजणी करण्यात येईल. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात येईल. त्यानंतर श्रीपालवण बुथ क्रमांक 1 पासून सुरुवात करुन चितळी बुथ क्रमांक 359 शेवटी मोजण्यात येईल. मतमोजणीच्या 26 फेर्या होणार आहेत.

मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. मतमोजणीमुळे वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस यंत्रणा दक्ष आहे.

एकूण मतदार : 3,40,211

- झालेले मतदान : 225735

- पुरुष मतदार : 117066

- महिला मतदार : 108669

- इतर मतदार :  0

- एकूण मतदान टक्केवारी : 66.35 %

काय झाले 2014 ला?

2014 ला 70.37% मतदान झाले होते. 2019 ला 66.35% मतदान झाले आहे. टक्केवारी कमी झाली असली तरी मतदानाची आकडेवारी वाढलेली आहे. 2014 ला 2,17,415 मतदान झाले होते मात्र यावेळी 225735 मतदान झाले आहे. त्यामुळे वाढलेले मतदार कुणाकडे झुकणार हे पहावे लागेल. मात्र मागील वेळेची पंचरंगी निवडणूक यावेळी तिरंगी असल्याने चुरस कमालीची वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: TMC नेता BJP मध्ये सामील व्हायला आला; पण भाजप कार्यकर्ता संतापला, चेहऱ्याला हिरवा रंग फासून बाहेर काढलं

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 2 दिवसांतच भावात मोठा बदल; मुंबई-पुणेसह महाराष्ट्रात आजचा दर किती?

ENG W vs SL W : रेकॉर्ड ब्रेकिंग मॅच! इंग्लंडचा दणदणीत विजय अन् श्रीलंकेविरुद्ध विक्रमांचा पाऊस; टीम इंडियाचाही विक्रम मोडला

Sex Determination Racket: गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश! पुण्यातून सहावे सोनोग्राफी मशीन जप्त; डॉक्टर, एजंट आणि गर्भपात केंद्रे पोलिसांच्या रडारवर

Nashik Rainfall : पावसाचे दिवस 40 ते 45 वर घसरले; बदलत्या पॅटर्नमुळे शेती अस्थिर, पीकवाढीचे चक्रच कोलमडले, 2019-2015 ची आकडेवारी काय सांगते?

SCROLL FOR NEXT