Shivendrasinghraje  
पश्चिम महाराष्ट्र

आमच्या वहिनीसाहेबांची माेहिम फत्ते ; समर्थकांची भावना I Election Result 2019

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांना 102550 इतके मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार दीपक पवार यांना 68278 इतके मते पडली आहेत. या मतदारसंघातील काही मते अद्याप माेजणे शिल्लक राहिली आहेत. शिवेंद्रसिंहराजेंच्या विजयात कार्यकर्त्यांसह पत्नी वेदांतिकाराजे यांचा म्हत्वपुर्ण वाटा मानला जात आहे. 




विधानसभेच्या लढतींना रंगत आली हाेती. उमेदवारांची कुटुंबे प्रचारात रंगू लागली हाेती. यात भाजप महायुतीचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिकाराजे भोसले याही काकणभर का होईनात पुढे आहेत. सातारा शहरासह शेंद्रे, परळी, लिंब गटासह जावळीचा काही भाग त्यांनी प्रचारासाठी पिंजून काढला. तब्बल 40 हून अधिक कोपरा सभा घेऊन त्या पतीला राजकारणातही भक्‍कम साथ दिली.

सातारा विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक पवार यांच्याशी सामना रंगला. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करत शिवेंद्रसिंहराजेंनी उमेदवारी मिळविल्याने ऐनवेळी दीपक पवारांना राष्ट्रवादीची कास धरावी लागली. मताधिक्‍याने विजयी होण्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंनी सतर्क राहून प्रचाराची मोहीम आखली आहे. त्यादृष्टीने सातारा शहर, ग्रामीण भाग व जावळी तालुक्‍यातील प्रचाराचा ताळमेळ साधला जात आहे. त्याला भक्‍कम साथही कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांनी दिली.

शिवेंद्रसिंहराजे सातारा शहरासह ग्रामीण भागात पदयात्रा, सभांवर भर दिला. तर, वेदांतिकाराजेंनी सातारा शहरासह शेंद्रे, परळी, लिंब या गटात कोपरा सभांवर जोर दिला. दररोज सायंकाळी दोन सभा तसेेच तब्बल 40 हून अधिक कोपरा घेऊन प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्याबरोबर वैयक्‍तिक भेटी, घरभेटी, महिला मेळावे, मोठ्या सभांना उपस्थित राहणे असाही प्रचार सुरू ठेवला. शिवाय, प्रचार कार्यालयाची जबाबदारीही त्यांनी नेटाने पार पाडली. 

प्रचारादरम्यान (कै.) अभयसिंहराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात कोणती विकासकामे केली, पुढील काळात मतदारसंघाची काय गरज आहे, काय करायचे आहे, पक्षांतरामागील भूमिका, महिलांसाठी काय करत आहे, काय करायचे आहे, या बाबी प्रचार सभांमधून त्या मांडत हाेत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT