mahaveer.jpg
mahaveer.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

महावीर जयंती केली घरातूनच : दिवसभर "देऊळ बंद' 

सकाळवृत्तसेवा

सांगली-आपल सण कितीही मोठा असला तरी त्याहून मोठे या देशावरील संकट आहे, याची जाणीव ठेवून जैन धर्मीयांनी आज घरातून भगवान महावीर जयंती केली. घरीच नमोकार मंत्रपठण करण्यात आले. मंदिरामध्ये पंडितांनी एकट्याने जावून पूजा विधी केले. सालाबादाप्रमाणे कोणतेही कार्यक्रम घेतले नाहीतच, शिवाय दिवसभर "देऊळ बंद' कडक पाळण्यात आले. अनेक ठिकाणी सत्पात्री दान देऊन संकटकाळात गोरगरिबांना मदतीला हात देण्यात आला. 


भगवान महावीर जयंतीवर कोरोना विषाणूमुळे देशभर लागू असलेल्या लॉक डाऊनचे सावट होते. त्यामुळे जैन धर्मीय नेत्यांनी आज कोणत्याही स्थितीत घरातून बाहेर पडू नका, असे स्पष्ट आदेश दिले होते. जयंती सोहळ्याचे सर्वच्या सर्व कार्यक्रम रद्द केले होतेच, शिवाय दर्शनासाठीही कुणी मंदिरात जायचे नाही, असे बजावण्यात आले होते. केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही हा नियम काटेकोर पाळण्यात आला. येथील गावभाग, वखारभाग, नेमिनाथनगर येथे बस्तीमध्ये धार्मिक कार्यक्रम पहाटे लवकरच आवरण्यात आले. लॉक डाऊन असले तरी घरोघरी खीर करण्यात आली. त्याचा मनमुराद आस्वाद साऱ्यांनी घेतला. या संकटाच्या काळात गोरगरिबांना मदतीचा हात द्या, असे आवाहन करण्यात आले होते. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. कुठेही गाजावाजा न करता अनेकांनी मदत देऊ केली. 
 

हिंगणगाव येथे ऑनलाईन दर्शन-

महावीर जयंतानिमित्त संपूर्ण पूजा व दर्शनाची सोय ऑनलाईन करत हिंगणगाव येथे वेगळा प्रयोग करण्यात आला. सर्व जैन भाविकांना घरात बसून पूजेचे दर्शन घडले. पंडित बाहुबली उपाध्ये यांनी हे नियोजन केले. माजी उपसरपंच व तंत्रस्नेही शिक्षक अनंत पाटील यांनी त्याची सोय केली. त्याची लिंक जैन बांधवांसह गावकऱ्यांना पाठवली. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT