Raju Shetti
Raju Shetti sakal
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti : मी कोणाहीसोबत जाणार नाही, मला त्यांच्यात रस नाही, मी स्वतंत्र लढणार

धर्मवीर पाटील

इस्लामपूर (जिल्हा सांगली) - सत्ताधारी भाजप प्रणित महायुती आणि विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादी गटाकडून आपल्याशी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संपर्क सुरू आहे. दोघांनीही त्यांच्यासोबत येण्याचा प्रस्ताव ठेवला आहे; मात्र मी कोणाहीसोबत जाणार नाही. मला त्यांच्यात रस नाही, मी स्वतंत्र लढणार आहे असा इशारा माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.

बुधवार (ता. ७) वाळवा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी आल्यानंतर त्यांनी संवाद साधला. गेले काही दिवस त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सहाही तालुक्यांमध्ये संपर्क वाढवला आहे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. आज त्यांनी वाळवा तालुक्यातील शेतकरी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.

निवडणूक आणि तयारीच्या पार्श्वभूमीवर बोलताना श्री. शेट्टी म्हणाले, 'माझी निवडणूक अथवा उमेदवारी ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी व ग्रामीण भागातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आहे. मला राजकारणात करिअर करायचे नव्हते किंवा यापुढेही करायचे नाही. मला जे करायचे होते ते करून झाले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना ही केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी केली होती आणि मी त्यावर आधीपासून ठाम आहे. मला राजकारण करायचे नाही. त्यामुळे दोन्ही आघाड्यांकडून मला लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी बोलवले जात आहे; परंतु या दोघांसोबतही जाण्यात मला रस नाही. मी सर्वसामान्य घटक, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे.' स्वाभिमानीचे नेते भागवत जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मतदारसंघ सोडल्याची अफवाच!

आगामी लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने हातकणंगले हा लोकसभा मतदारसंघ राजू शेट्टी यांच्यासाठी सोडला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे; परंतु ही केवळ अफवाच आहे. कारण शेट्टी यांनी तसा कोणताही शब्द कोणत्याही राजकीय पक्षाला अथवा नेत्याला दिलेला नसल्याचे स्पष्ट आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT