main pipe line leakage in belgaum for today water wastage 
पश्चिम महाराष्ट्र

Video : बेळगावात पाणी पुरवठा मंडळाची मुख्य पाईपलाईन फुटली; लाखो लीटर पाणी रस्त्यावर

सतीश जाधव

बेळगाव : गोवावेस येथे स्मार्ट सिटीअंतर्गत खाऊ कट्ट्याचे काम सुरु आहे. मंगळवारी (9) सकाळी साडेसातच्या सुमारास कुपनलिका खोदाईच्या कामावेळी पाणी पुरवठा मंडळाची मुख्य जलवाहिनी फूटून लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली. मुख्य जलवाहिनी असल्याने पाण्याचे फवारे सुमारे 80 ते 100 फुटापर्यंत उडत होते. गोवावेस मुख्य रस्त्याला काही वेळ तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते.

गोवावेस येथे चार दिवसांपूर्वी खाऊ कट्ट्याचे उद्‌घाटन करण्यात आले आहे. काही गाळ्यांचे काम अजूनही सुरु आहे. प्रत्यक्षदर्शनिकडून मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी कुपनलिका खोदाईचे काम सुरु होते. खोदाई करते वेळीच मुख्य जलवाहिनी फूटली. सुमारे अर्धा तास पाण्याचे फवारे उडत होते. सकाळी 8.10 मिनीटांनी पाणी पुरवठा मंडळाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाल्यानंतर पाणी बंद करण्यात आले. तोपर्यंत लाखा लिटर पाण्याची नासाडी झाली होती. स्मार्ट सिटीच्या या गलथान कारभाराचा फटका बेळगावकरांना बसला आहे.

लक्ष्मी टेकडीपासून घुमटमाळकडे गेलेली ही पाणी पुरवठा मंडळाची मुख्य जलवाहिनी आहे. लक्ष्मी टेकडीवर पाणी शुद्ध करून घुमटमाळ येथे सोडले जाते. याठिकाणाहून त्या भागातील रहिवाशांना पाणी सोडले जाते. मंगळवारी सकाळी पाणी सोडले असतानाच जलवाहिनी फुटल्याने पाणी वाया गेले. पाणी पुरवठा मंडळाने तातडीने काम हाती घेतले होते. मंगळवारी सायंकाळपर्यंत दुरुस्ती केली जाईल. अशी माहिती त्यांनी दिली.

याठिकाणी स्मार्ट सिटीचे काम सुरु होते. सुमारे अर्धा तास पाणी वाया गेले. माहिती मिळाल्यानंतर तातडीने पाणी बंद केले. मुख्य जलवाहिनी असल्याने जादा पाणी वाया गेले. मंगळवारी सायंकाळपर्यंत दुरुस्ती केली जाईल.

- उमेश शिगिहळ्ळी, सहाय्यक कार्यकारी अभियंते, पाणी परवठा मंडळ

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT