main suspect in the Nimsod murder case in Sangli has been arrested 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीतील निमसोड खून प्रकरणातील मुख्य संशयिताला अटक

संतोष कणसे

कडेगाव : निमसोड (ता. कडेगाव) येथे शेत जमिनीच्या वादातून सुरेश उर्फ सूर्यकांत आत्माराम जाधव यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी कैलास भगवान जाधव (वय-39,रा.निमसोड,ता.कडेगाव) याला कडेगाव पोलिसांनी अटक केली. त्याला आज कडेगाव येथील न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी त्याला शुक्रवारपर्यंत (ता.12) पोलिस कोठडी सुनावली आहे.

मुख्य संशयित कैलास भगवान जाधव हा गेल्या चार दिवसांपासून फरारी होता, त्याचा शोध कडेगाव पोलिस घेत होते. परंतु तो मिळून येत नव्हता. तर तो येथे एमआयडीसी परिसरात असल्याची कडेगाव पोलिसांना टीप मिळाली होती. त्यानंतर कडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षण संदीप साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह पोलिस पथकाने त्याला एमआयडीसी येथे सापळा रचून अटक केले. 

निमसोड येथे शेत जमिनीच्या वादातून व  शेतातील पाण्याचा कॉक चालू राहिल्याच्या कारणावरून संशयित आरोपी कैलास भगवान जाधव, भगवान दाजी जाधव, रुक्मीणी भगवान जाधव (सर्व रा.निमसोड ता.कडेगाव) यांनी संगणमत करुन सुरेश उर्फ सुर्यकांत आत्माराम जाधव यांना शिविगाळ, दमदाटी करुन हातातील लाकडी दांडक्याने व लाकडी काठीने डोक्यात वार करुन गंभीर जखमी केले होते. तसेच सुरेश उर्फ सुर्यकांत हे जखमी अवस्थेत जमिनीवर पडले असतानाही त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन त्यांचा खून केला. तसेच सुरेश यांची पत्नी फिर्यादी रोहिणी जाधव, आई छबुताई जाधव यांनाही लाकडी दांडक्याने व काठीने मारहाण करुन जखमी केले होते.

या खूनप्रकरणी कडेगाव पोलिसांनी संशयित भगवान दाजी जाधव व रुक्मिणी भगवान जाधव यांना यापूर्वी अटक केले आहे. तर या खून प्रकरणातील मुख्य संशयित कैलास  भगवान जाधव हा फरारी होता,त्याला पोलिसांनी अटक केले.  

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT