Maize.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

आटपाडीत बाजार समितीत होणार मका खरेदी 

सकाळवृत्तसेवा

आटपाडी (सांगली)- आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीला हमीभाव दराने मका खरेदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. कागदपत्रे आणि अटीची पूर्तता करून काही दिवसातच आटपाडीत हमीभाव दराने मका खरेदी केंद्र सुरू होणार आहे. यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांची चालू असलेली लूट थांबणार आहे. 


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे आटपाडीत मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. तालुक्‍यात दिघंची, पळसखेल, पुजारवाडी, राजेवाडी, निंबवडे, नेलकरंजी, हिवतड, काळेवाडी, करगणी, वाक्षेवाडी, आवळाई, शेरेवाडी आदी भागात रब्बी आणि उन्हाळी हंगामात मक्‍याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले आहे. सध्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तयारीसाठी पैशाची गरज आहे. त्यासाठी मका विक्री चालू केली होती मात्र व्यापाऱ्यांनी लकडाउनचे कारण सांगून दर अकराशे रुपये प्रतिक्विंटल वर आणले होते. प्रशासनाने आटपाडी बाजार समितीला हमीभाव दराने मका खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

सध्या मक्‍याचा हमीभाव सतराशे साठ रुपये आहे. पुढच्या हंगामात हमीभावात वाढ होणार आहे. सध्या बाजार समितीकडून मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी अटी आणि कागदपत्राची पूर्तता करण्याचे काम गतीने सुरू केले आहे. येत्या काही दिवसांतच पूर्तता करून मका खरेदी केंद्र सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

आटपाडीत मका खरेदी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळे व्यापाऱ्यांनीही 100 रुपये क्विंटल मागे वाढ केली आहे. केंद्र सुरू झाल्यावर आणखी दर वाढवतील, असा अंदाज आहे. अशीच परिस्थिती ती डाळिंब दरात झाली होती. डाळिंबाचा अवधी बाजार सुरू झाला आणि बांधावर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी डाळिंबाच्या दरात वाढ केली आहे. मका खरेदी केंद्र आणि डाळिंब सौदेबाजार सुरू केल्यामुळे बाजारातील मका आणि डाळिंबाला चांगला दर मिळू लागला आहे. काही प्रमाणात शेतकऱ्यांची होणाऱ्या लुटीला चाप बसला आहे. 


आटपाडी बाजार समितीला हमीभाव दराने मका खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश मिळाले आहे. त्यादृष्टीने तिची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे.

-भाऊसो गायकवाड (अध्यक्ष आटपाडी बाजार समिती) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

Miraj PSI Death : मिरजेतील पीएसआयने कॉल, मेसेजला उत्तर दिलं नाही; नंबर ट्रॅक लावला अन् घटनास्थळी पाहताच, एसपींसह सांगली पोलिसांना बसला धक्का

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Nashik: कुंभमेळ्याची तयारी सुरु असताना नाशिकला ‘पाण्याचा आशीर्वाद’? अंडरपास खोदकामात सापडली १२५ वर्षांपूर्वीची पाण्याने भरलेली विहीर

Kolhapur Money Fraud : नफ्याच्या आमिषाने २१ लाखांची  फसवणूक ; संशयित गडहिंग्लजचा, व्यापारी चंदगडचा

SCROLL FOR NEXT