Makar Sankranti Wishes On Social Media Kolhapur Marathi News 
पश्चिम महाराष्ट्र

व्हाॅट्सअप वर मकर संक्रातीच्या शुभेच्छांचा नुसता धुरळा....

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सजवलेले ताट, बाजरीची भाकरी, त्यावर लालचुटुक गाजर, राळ्याचा भात, कांदापात, मिक्‍स भाजी असलेले छायाचित्र शेअर करत सोशल मिडीयावर भोगीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तर पारंपारिक उत्साहात दोन दिवसीय मकर संक्रांती सणाला आज (ता. 14) प्रारंभ झाला. भोगीने या सणाचा प्रारंभ झाला असून बुधवारी (ता. 15) मकर संक्रात साजरी होणार आहे. 

संक्रांतीच्या शुभेच्छांचे आदानप्रदानही सुरु झाले आहे. सकाळपासूनच भोगी व मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देणारे संदेश मोबाईलवरुन फिरु लागले आहेत. चार दिवसांपासून बाजारपेठेत तिळगूळ स्टॉल्स सजू लागले होते. मात्र, खरेदीसाठी म्हणावी तशी गर्दी जाणवत नव्हती. मात्र, रविवारपासून खरेदीला ग्राहकांचा प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून आले. तिळगुळाबरोबरच लहान मुलांचे आकर्षण असणारे तिळगूळ वाटपाचे लहान प्लास्टीक डब्यांनाही मागणी वाढली.

मकर संक्रांतीने बाजारपेठ बहरली... 

शहराच्या प्रमुख मार्गांच्या दुतर्फा तिळगूळ विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. फिरत्या विक्रेत्यांबरोबरच अनेकांनी दुकानांसमोर खास तिळगूळ स्टॉल उभारले आहेत. अर्धा किलो, पाव किलो, दहा रुपये, पाच रुपये अशा पॅकिंगमधून तिळगूळ विक्री केली जात आहे. साध्या तिळगुळांबरोबरच अन्य विविध प्रकारच्या तिळगुळांची विक्रीही केली जात आहे. भोगी सणाच्या विशेष असलेल्या बाजरीच्या भाकरी घरोघरी सकाळीच केल्या आहेत. भोगीच्या भाकरींवर गाजर, कांदापात, राळ्याचा भातावर दही, भाजी व तिळगूळ घालून नैवेद्य दाखवण्यात आला. 

क्लिक करा- कब्रस्तान बनली त्यांची कर्मभूमी.....
 
काही शुभेच्छा संदेश : 
"तिळगूळ घ्या गोड बोला', "भोगी आणि मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा', "कृपा करून मकर संक्रांतीला तिळगूळ आणि लाडू यांचे फोटो पाठवू नका, नुसत्या शुभेच्छा पाठवा. मागच्या वर्षी मोबाईल चिकट झाल्यामुळे बदलावा लागला. तिळगूळ व लाडू घरपोच करा', "गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या, मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या, या संक्रांतीला तिळगूळ खाताना आमची आठवण येऊ द्या. 
 
"ट्रॅडिशनल' डे 
मकर संक्रांतीच्या पार्श्‍वभुमीवर महाविद्यालयांमध्ये ट्रॅडिशनल डेचे सेलिब्रेशन होते. पारंपारिक वेशभुषेत आलेल्या विद्यार्थी विद्यार्थिंनी यादिवशी एकमेंकाना तिळगुळ देतात व नात्यातील गोडवा आणखी वाढवतात. त्यानिमित्ताने शहरातील काही महाविद्यालयात आज ट्रॅडिशनल डे साजरा होत आहे. तर बहुंतांश महाविद्यालयात उद्या (ता. 15) साजरा होणार आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : वातावरण खराब असल्यामुळे...! मोदींनी सांगितलं मणिपूरला उशीरा पोहचण्याचे कारण...

'शिवाजीनगर मेट्रो' स्थानकाचे नाव बदलण्यावरून वाद; फडणवीसांचा तीव्र विरोध, कर्नाटकचे CM म्हणाले, 'आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे...'

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या सत्तर टक्के प्रश्नपत्रिका ‘ऑनलाईन सेट’, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर

Movie Review : दशावतार - प्रेम, सूड, श्रद्धा आणि त्यागाची उत्तम गुंफण

Chhagan Bhujbal : ‘ओबीसीतूनच आरक्षण हवे, तर इतर सर्व आरक्षण सोडणार का?’ भुजबळांचे आव्हान

SCROLL FOR NEXT