रास्तभाव धान्य दुकान sakal
पश्चिम महाराष्ट्र

माळेवाडीचे रेशन दुकान कायमस्वरुपी बंदचे आदेश

माध्यमिक शिक्षक आणि संस्थेचे अध्यक्ष स्वतः दुकान चालवत होते.

सकाळ वृत्तसेवा

आटपाडी : माळेवाडी येथील म्हाळसाकांत ग्रामविकास संस्था चालवत असलेल्या वादग्रस्त रास्त भाव दुकानावर जिल्हा पुरवठा अधिकारी आणि विभागीय पुरवठा आयुक्तांनी कायमस्वरुपी बंद करण्याची कारवाई केली होती. त्या विरोधात संस्थेने केलेले अपील राज्य सरकारने फेटाळून संस्थेचे रास्त भाव दुकान कायमस्वरुपी बंद करण्याचा आणि आर्थिक दंड भरण्याचा आदेश कायम ठेवला.

माळेवाडी (ता. आटपाडी) येथील म्हाळसाकांत ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष माध्यमिक शिक्षक आहेत. ही संस्था गावात रास्त भाव दुकान चालवत होती. या दुकानाविरोधात ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी होत्या. सततच्या तक्रारीमुळे दुकान वादग्रस्त झाले होते. गावकऱ्यांनी तालुका आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्याआधारे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यावर गहू, तांदूळ, हरभरा डाळ, मका, साखर साठ्यात तफावत आढळली. तसेच सेल्समन म्हणून नेमलेले शिक्षक दुकान चालवणाऱ्या संस्थेचे कर्मचारीही नव्हते.

तपासणीत आढळलेल्या तफावतीच्या आधारे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी १८ फेब्रुवारी २०१९ रोजी दुकान कायमस्वरुपी बंद करण्याचा आणि १६५४ रुपये दंड भरण्याचा आदेश दिला. त्यावर संस्थेच्या अध्यक्षांनी आयुक्तांकडे अपील केले. आयुक्तांनीही ११ नोव्हेंबर २०२१ रोजी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला. त्यानंतर संस्थेने पुन्हा थेट राज्य सरकारचे दरवाजे ठोठावले. राज्य सरकारनेही वादग्रस्त दुकान कायमस्वरुपी बंद करण्याचा आणि आर्थिक दंड भरण्याचा आदेश नुकताच कायम ठेवला आहे.

माध्यमिक शिक्षक आणि संस्थेचे अध्यक्ष स्वतः दुकान चालवत होते. ते संस्थेचे कर्मचारी नसतानाही सेल्समन म्हणून काम करत होते. गावातील लोकांची प्रचंड अडवणूक, पिळवणूक करीत होते. त्यामुळे आम्ही तक्रार केली. राज्य सरकारनेही जिल्हा पुरवठा अधिकारी आणि विभागीय पुरवठा आयुक्तांनी दिलेला आदेश कायम ठेवला आहे. न्याय उशिरा का असेना, पण निश्चित मिळतो.

- प्रकाश गायकवाड, अध्यक्ष मनसे, शेतकरी संघटना आटपाडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

Fatty Liver: भारतात झपाट्याने वाढतोय फॅटी लिव्हरचा धोका! अशी ओळखा लक्षणे...

Latest Marathi News Update : मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

What Action Will Tukaram Mundhe Take? बनावट दूध पावडरचे मोठे रॅकेट अन् अधिकाऱ्यांचे हात गुंतल्याचा संशय; सिन्नरमधील 'त्या' घोटाळ्याची मुंढेकडे लेखी तक्रार, काय कारवाई होणार?

IMD Weather Forecast : 500 मिमीवरून पाऊस थेट शून्यावर! पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावरील पावसाला अचानक का लागला ब्रेक? 'आयएमडी'ने दिले स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT