Malewadi sealed; Administration in motion: Fear in Kokrud area due to Corona 
पश्चिम महाराष्ट्र

माळेवाडी सीलबंद; प्रशासन गतिमान :कोकरूड परिसरात भीतीचे वातावरण 

सकाळवृत्तसेवा

कोकरूड (जि. सांगली) : कोकरूड पैकी माळेवाडी (ता. शिराळा) येथील 58 वर्षीय चाकरमानीचा शुक्रवार रात्री उशिरा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कातील आलेल्या सहा जणांना शिराळा येथे संस्थात्मक विलगिकरण करण्यात आले असून, माळेवाडीसह कोकरूड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या घटनेनंतर या भागात प्रशासनाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. गाव सीलबंद करण्यात आले असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, माळेवाडी येथील मुंबईस्थित चाकरमानी 3 जून रोजी मुंबईहुन माळेवाडी येथे आला होता. त्याची आरोग्य तपासणी व स्वॅब 4 जून रोजी घेण्यात आला होता. त्याचा कोरोना चाचणी अहवाल 5 जून रोजी रात्री पॉझिटिव्ह आला. रात्री उशिरा प्रशासनाने माळेवाडी येथे येऊन आपल्या हालचाली गतिमान केल्या आहेत. यावेळी रुग्णाच्या संपर्कात आलेल्या पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातू व ज्या गाडीने आला त्या गाडीचा चालक यांना शिराळा येथील संस्थात्मक विलीनीकरण कक्षात पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, रात्री माळेवाडी येथे तहसीलदार, गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, स.पो.नि. दत्तात्रय कदम, तलाठी, ग्रामसेवक यांनी गावास तात्काळ भेट देऊन हालचाली गतिमान केल्या. आरोग्य विभागा व ग्रामपंचायत सतर्क होऊन संपूर्ण गावात उपाय योजना सुरू केल्या केल्या आहेत.

दरम्यान, तालुक्‍यातील पश्‍चिम भागात माणदूर 6, खिरवडे 2, चिंचोली 1, रिळे 4, काळोखेवाडी 1, मळेवाडी 1 असे दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण वाढू लागले असून कोरोना बाधित एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT