crime
crime 
पश्चिम महाराष्ट्र

दीड कोटींच्या विम्यासाठी मित्रच झाला वैरी; मृतदेहासह पेटवून दिली कार

सकाळ वृत्तसेवा

भाडळे : व्यवसायात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी विमा कंपनीकडून लाभ घेण्यासाठी स्वतःच्याच खुनाचा बनाव करून त्यासाठी समान शरीरयष्टीच्या मित्राचा खून करून फरारी झालेल्या सुमित सुरेश मोरे यास पोलिसांनी अटक करत तीनच दिवसांत गुन्हा उघड केला. तानाजी बाबा आवळे (रा. उकिर्डे, ता. माण) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. 21) भाडळे येथील बोधेवाडी घाटमाथ्यावर जळलेल्या अवस्थेत कार (एमएच 01 डीबी 7105) व अर्धवट जळलेल्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत खात्री करून नातेवाइकांनी करून हा मृतदेह सुमित सुरेश मोरे (रा. महिमानगड, ता. माण) याचा असल्याचे पोलिसांना सांगितले होते. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या सूचनेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी पथके पाठवून तपास सुरू करण्यात आला होता. त्यातून खुनाचे गुढ उलघडले. 

स्वतःवर प्रोटीन व्यवसायात झालेले कर्ज फेडण्यासाठी दीड कोटीचा विमा उतरवून त्याचा लाभ घेण्यासाठी सुमित मोरे याने स्वतःच्याच शरीरयष्टीचा तरुण तानाजी बाबा आवळे यास आमिष दाखवून फसवून दहिवडीला बोलावून घेतले. तेथे त्याचा डोक्‍यात वार करून त्याचा खून केला. पुरावा नष्ट करून विमा कंपनीची फसवणूक करण्यासाठी बोधेवाडी घाटात हा मृतदेह व स्वतःचीच कार पेटवून दिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जेजुरी येथून सुमितला अटक करून आज न्यायालयात हजर करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक घोंगडे, पोलिस उपनिरीक्षक पाटील, पोलिस नाईक कुंभार, मोरे, पवार यांच्यासह पुसेगावचे सहायक पोलिस निरीक्षक समाधान घोडके, लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक चौधरी यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Latest Marathi News Update : करकरेंविषयी वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा; शशी थरूरांची मागणी

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Skin Care : त्वचाविकार कधी येणार गरिबांच्या आवाक्यात ; मेडिकलला तीन वर्षांपासून ‘फ्रॅक्शनल सीओटू’ लेझर यंत्राची प्रतीक्षा

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT