mangalwedha
mangalwedha 
पश्चिम महाराष्ट्र

मंगळवेढा तालुक्याती ग्रमापंचाय निवडणूक चुरशिची

हुकूम मुलाणी

मंगळवेढा - तालुक्याच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधात भिडणाऱ्या नेत्यांच्या समर्थकांनी गावगाढयात मात्र राढा केला असून सरपंचपद आणि सत्ता मिळविण्यासाठी सोयीची होईल अशी युती करत सत्ता मिळविली. त्यामध्ये आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे या तिन्ही नेत्यांच्या गटांच्या ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केल्याचा दावा केला. निवडणूक 12 ग्रामपंचायतीची पण दावे मात्र 17 ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळाल्याचे करण्यात आले. हा निकाल आगामी निवडणूकीसाठी महत्वपुर्ण ठरणारा ठरला.

काल तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीसाठी सरासरी 87 टक्के मतदान झाले होते. आज शासकीय गोडावूनमध्ये मतमोजणी करण्यात आली. काही ग्रामपंचायतीव गड आला पण सिंह गेला अशी अनुभूती आली. थेट सरपंचपदाच्या निवडणूकीमुळे मोठया प्रमाणात आर्थीक उलाढाल झाली. या निवडणुक प्रकीयेवर प्रांतअधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार आप्पासाहेब समींदर, नायब तहसीलदार गणेश लव्हे, यांनी पारदर्शक पणे हाताळली तर उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सहायक पोलीस निरीक्षक वैभव मारकड, दत्तात्रय पुजारी शाहुराजे दळवी यांनी पोलीस व होमगार्डच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवला जित्ती ग्रामपंचायत आवताडे गटाला गमवावी लागली. त्या ठिकाणी भालके गटाला सरपंचपद व दोन जागा मिळाल्या सदस्यपदी जगन्नाथ जाधव व अंकुश सुरवसे यांना समान मते पडल्याने चिठीवर विजयी झाले. लोणार येथेही तुकाराम मदने आणि अर्जुन बुरूगले यांना समान मते पडल्याने अर्जुन बुरूगले यांना चिठ्ठीवर विजयी घोषित करण्यात आले. डिकसळ ग्रामपंचायत आ भालके गटाला गमवावी लागली त्या ठिकाणी परिचारक गटाला सत्ता मिळाली येळगी येथे आमदार भालके व आवताडे यांनी युती करत सत्ता मिळविली, लक्ष्मी दहिवडी येथे गत निवडणूकीत समान जागा मिळाल्याने भालके गटांने सदस्य पळवून सत्ता मिळविली आमदार भालकेनी मोठया प्रमाणात निधी मिळवून देवूनही या ठिकाणी सत्ता टिकवता आली नाही. आवताडे गटांनी सत्ता मिळवत गत निवडणूकीचा वचपा काढला हुन्नुर येथे सरपंच व 3 जागा भालके गटाला मिळाल्या आवताडे व साळे गटांनी सहा जागा मिळविल्या. पडोळकरवाडी येथे आवताडे व भालके गटांनी सत्ता मिळविली, मानेवाडी येथे आवताडे गटाने तर रेवेवाडी येथे आ परिचारक गटांने एकहाती सत्ता मिळविली येळगी येथे आवताडे व भालके गटांने सत्ता मिळविली आ परिचारक गटाने हुन्नुर, लोणार, रेवेवाडी, देगाव, डिकसळ ग्रामपंचायती मिळवल्याचा दावा केला आमदार भालके गटाने हुन्नुर, लोणार, पडोळकरवाडी, रेवेवाडी, जित्ती, येळगी या ग्रामपंचायतीवर तर, आवताडे गटांने खवे, लक्ष्मी दहीवडी, कागष्ट, येळगी, पडोळकरवाडी, मानेवाडी, डिकसळ या ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवल्याचा दावा केला.

निकालानंतर प्रशांत परिचारक यांच्या संपर्क कार्यालया समोर जिल्हा दुध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर, जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य युन्नुस शेख, माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, माजी जि.प.सदस्य नामदेव जानकर, आ.प्रशांत परिचारक युवा मंचचे अध्यक्ष बबलु सुतार यांच्या हस्ते सत्कार करणेत आला.तर आ.भालके यांच्या कार्यालयात युवराज शिंदे महेश दत्तु रावसाहेब फटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर आवताडेच्या कार्यालयात संचालक बबन आवताडे, सभापती प्रदीप खांडेकर, अध्यक्ष सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

गावनिहाय विजयी सरपंच, उमेदवार व मते 
१)डिकसळ:- सरपंच -पाटील शामल संजय (२०७), सदस्य - जाधव सागर सुभाष (९२), जाधव विमल बबन (९६), पाटील वैशाली विश्वास (६१), मंडले आनंद सुखदेव (५९), शिंदे सावित्रीबाई सुग्रीव (५६), शिंदे लक्ष्मण दत्ता (९८), मंडले उषा सत्यवान (७९), बिनविरोध एक-ज्योती गंगाराम कांबळे.

२)लक्ष्मी दहिवडी:-  सरपंच- जुंदळे मनीषा नंदकुमार (२ हजार ३९६) , सदस्य - शेजाल आणा पांडा (५०१),जलगिरे प्रियांका संतोष (५५७),पाटील अनिता अनिल (३१२), साळे श्रीकांत गोरख (५२४), जुंदळे रामेश्वर लक्ष्मण (४७३),कांबळे सिंधू अशोक (४३७),क्षीरसागर हणमंत कृष्णा (४६०), कडलासकर शोभा सूर्यकांत (५४४), टाकले विजय नागनाथ (४६८),शेख युसूफ आदाम (४६३), राजमाने सुनीता नामदेव (५५०), जाधव इंदूबाई अशोक (४७७),
बिनविरोध एक -तानाजी धोंडिबा पाटील 

३)देगाव:- सरपंच-ढेकळे राणी राजाराम (२९१) , सदस्य - मस्के मधुकर कोंडीबा (९१), बनसोडे मंगल हणमंत(१०४), डोईफोडे शरद पांडुरंग (९६),बनसोडे लता नंदु (९२), मेटकरी सुरेश गिरजाप्पा (१२५),डोईफोडे सिंधू दत्तात्रय (१४६), पाटील छाया पांडुरंग (१२३).

४)जित्ती :- सरपंच - खांडेकर ललिता दत्तात्रय (५६२), सदस्य - खांडेकर श्रीमंत रामा (१९३), जाधव जगनाथ सोपान (चिट्टीवर १७८), मोरे करिष्मा बंडू (१९४), कुलकर्णी नितीन सुधाकर (२५२), इंगोले नीता अशोक (२३२), पडवळे यमुना तुकाराम (२५९), इंगोले सुरेश प्रकाश (१८१),लवटे बुकाबाई म्हाळाप्पा (१५२),मुलाणी गुलरबी मदार (१६४).

५)खवे:- सरपंच-विकास दादा दुधाळ (४३८),सदस्य - अनिल विठ्ठल दुधाळ (११६),शेवंता ज्ञानोबा दुधाळ (११५),शिवाजी कोंडीबा ढावरे (१५९),सीताबाई मनोहर साळुंके (१५९),सिद्धगोंडा लोकाप्पा पाटील (१६४), सुवर्णा पोपट ढावरे (१९०), पूजा राजू भोसले (१९०).

६)येळगी:-सरपंच- सचिन चंद्रकांत चव्हाण (२७०),सदस्य - पारे सोमराया जकराया (८५),सांगोलकर प्रियंका रगू (८५),चव्हाण अमर दादासो (८५),इंगोले अनिता किरण (९७),पडवले नागाप्पा मलाप्पा (१०६),पडवले छाया रेवाप्पा (११२), पडवले यांनावा सिध्दाप्पा (१०६).

७)कागष्ट:-सरपंच- काकेकर शाम्पल संजय (४४२),सदस्य - कारंडे रावसाहेब यशवंत (११५),काकेकर छाया जगनाथ (१०७),माने अंजना भाऊसाहेब (११२),गंगणे धर्मराज मुकींदा (२५३),सांगोलकर पद्मिनी मनोहर (२३६),हाके इंद्राबाई बजरंग (२०७).

८)हुन्नूर:-सरपंच-मनीषा मचिंद्र खताळ (९८९),सदस्य - पुजारी शंकर ईश्वर (३१७),चव्हाण सरस्वती अनिल (३७७),क्षीरसागर रतन दत्तात्रय (३४७),माने भगवान आप्पा (३९२), साळे प्रविणकुमार कुंडलिक (३५१),काशिद स्मिताराणी शशिकांत (४१०),साळुंखे सुरेश तुळशीराम (३४३),माने अंबाबाई सौदागर (३९१),सूर्यवंशी छाया भारत (३७४).

९)मानेवाडी:-सरपंच-गीताबाई दत्ता मळगे (५७६), सदस्य - रामचंद्र सुखदेव गावडे (१९८),इरकर जयकर जनार्धन (२१७),माने शीलाबाई बाळू (२०९),अमंगे केराप्पा तुका (२१६), गावडे तुळसा भाऊ (२५५),मेटकरी कृष्णाबाई तुकाराम (२४६),जगताप आप्पा अगनु (२५५),इंगोले शकुंतला कुंडलिक (२९६),शिंदे कल्पना अनिल (२७३).

१०)रेवेवाडी:- सरपंच- ब्रम्हदेव दाजी रेवे (५८१),सदस्य - रेवे तिपना ज्ञानू (२०४),चोपडे नामदेव संभा (१९६),धुळगुडे सुरवंता नामदेव (१८६),चौगुले धनंजय भीमाशंकर (२२८),लेंगरे बायडाबाई बाळू (२०६),शिंदे मालन पोपट (२२२),पुजारी रामा जकाप्पा (१७९),शेंडगे चिंगुबाई नामदेव (१७६),रेवे सिंधुबाई तुकाराम (१८५).

११)लोणार:-सरपंच-पडोळकर सुनंदा विठ्ठल (९३६),सदस्य- बुरुंगले अर्जुन पांडुरंग (चिट्टीवर २६३), ऐवळे धानवा भागाप्पा (३२८),बिराजदार भारती मांतेश (३२५),बुरुंगले नवनाथ नामदेव (३१८),इरकर सविता रावसाहेब (३०७),जावीर सुजाता सिद्राम (२९५),जावीर नारायण कामा (२६१),सरगर सिद्धू ज्ञानोबा (२३७),जावीर मंगल हेरू (२४८).

१२)पडोळकरवाडी:- सरपंच-मरगु यशवंत कोळेकर (७४९),सदस्य -मदने सावाप्पा कोंडीबा (२२३),गोरड शांताबाई नामदेव (२१०),बावदाणे सुमा अप्पासो (२०९),पडोळकर बिरुदेव रघुनाथ (२३६),झंजे शंकूतला अंकुश (२५६),शिंगाडे लक्ष्मी धोंडीराम (२६३),पडोळकर हरिनाम आऊबा (३१२),कुलाळ राघू सोमा (३२२),रोडे मंगल नारायण (२८६).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT