mango 
पश्चिम महाराष्ट्र

गावरान आंब्याचे उत्पादन का घटण्याची शक्‍यता ?

गजानन पाटील

पेड (सांगली) - यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस पडूनसुद्धा अद्यापही ग्रामीण भागात आंब्याला मोहोर फुटलेला नाही. जानेवारी महिना सुरू होऊन बारा दिवस झाले तरी मोहोर न फुटल्याने शेतकरी चिंतेत आहेत. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मोहोर फुटण्यास सुरवात होते. आता जानेवारी सुरू होऊन आठवडा लोटला तरीही जुन्या गावरान झाडांना मोहोर आलेला नाही. त्यामुळे मोहोर येण्याची आशा धूसर होत चालली आहे.

अद्याप मोहोर नाही; उशिरा आलेली थंडी व धुक्‍याचा परिणाम

आंबा हा फळांचा राजा आहे हे जगमान्य झालेले असून सद्यस्थितीत आंबा हे सर्वत्र महत्त्वाचे पैसे मिळवून देणारे फळपीक झालेले आहे. उशिरा आलेल्या थंडीमुळे व धुक्‍यामुळे आंब्याची अनेक झाडे मोहरली नाहीत.काही झाडांना थोडाफार आलेला मोहोर  करपून जात आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत. पूर्वी ग्रामीण भागात गावाच्या आजूबाजूला आमराई असायची त्यामुळे सर्वसामान्य माणसाला आंब्याची किंमत वाटायची नाही; परंतु कालांतराने वृक्षतोड माफियांकडून या फळाच्या झाडांची कत्तल झाली त्यामुळे ही आमराई नामशेष झाली आहे. त्यामुळे गावागावात मिळणारे आंब्याचे उत्पादन घटले आहे. परंतु आजच्या परिस्थितीत शेतकऱ्यांकडे घरात खाण्यासाठी किंवा आल्या गेल्या पाहूण्यांना देण्यासाठी ही आंबा नसतो ही शोकांतिका आहे. आता चार - दोन शेतकऱ्यांकडे दोन चार आंब्याचे झाडे आहेत. त्यांना या वर्षी या झाडांना अजुनही मोहर फुटलेला दिसत नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक लोणचे, आमरस यासाठी संकटात येणार असे चित्र दिसत आहे. ’आंबा पिकतो पाऊस गळतो’ आंबा पिकला की पाऊस जास्त होणार अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. परंतु या वर्षी आंब्याला मोहर दिसत नसल्यामुळे शेतकरी चिंतीत झाला आहे. 

गतवर्षीही बसला होता फटका 

गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात झाडांना मोहोर दिसत होता, त्यामुळे उत्पन्न चांगले मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा वाटत होती; मात्र वातावरणातील परिणामामुळे गतवर्षी मोहोर गळून गेला होता, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली होती. गेल्या पंधरवड्यात पडलेल्या दाट धुक्‍यामुळे आंब्याच्या मोहराला फटका बसला असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या धुक्‍याच्या कहरामुळे, ढगाळ वातावरणामुळे आलेला तुरळक मोहोर गळून जात आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

Parbhani News: फ्लॅट संस्कृती वाढली; पण घर घेणे झाले महाग!; रेडीरेकनर दरवाढीचा फटका;नागरिकांचे बजेट कोलमडले

IPL Viral Video: ए चल निघ आता... इशान किशनला आऊट करत SRH च्याच गोलंदाजाचा रागात इशारा, मग पुढे...

Raam Navami 2026: रामनवमीपूर्वी 'या' 5 गोष्टी घरात आणा, सुख-समृद्धी निश्चित अन् माता लक्ष्मीचे आगमनही होईल

ना कुत्रा ना मांजर; पूजा सावंतला घरात पाळायचा आहे हा भयंकर प्राणी ! अभिनेत्रीचा खुलासा

SCROLL FOR NEXT