Mango trees Mohar since November 2020 
पश्चिम महाराष्ट्र

यंदा लवकरच चाखता येणार आंब्याची चव   

सकाळ वृत्तसेवा

खरसुंडी - यावर्षी नैसर्गिक रित्या देशी, हापुस व केसर जातीच्या आंबा झाडांना नोव्हेंबरपासूनच मोहर येण्याची प्रक्रिया सुरू झाली. फळांचा राजा आंबा वेळेत हंगामात येणार आहे. अशी शक्‍यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. 

गत दोन वर्षात निसर्गाच्या बदलत्या वातावरणाचा परिणाम आंबा व चिंच फळ पिकावर मोठ्या प्रमाणात झाला. नैसर्गिक रित्या आंबा झाडांना मोहर येण्याची प्रक्रिया नोव्हेंबर पासून सुरू होते. दोन वर्षात या कालावधीमध्ये व अगोदर अनिमित झालेल्या पावसाचा परिणाम या फळ पिकावर झाला. त्याचा परिणाम आंबा पिकावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्याचबरोबर सर्वसामान्यांना आंब्याची चव चाहता येऊ शकली नाही. अत्यंत अल्प प्रमाणात आटपाडी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले.वेळे मोहर न आल्यामुळे फळधारणा कमी प्रमाणात होऊन दोन वर्षात आंबा उत्पादन घटले. आटपाडी तालुक्‍यात पश्‍चिम भागात दहा वर्षापूर्वी हापूस व केसर जातीच्या आंब्याची कृषी खात्याच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत आठ ते दहा हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली. चिंचाळे खरसुंडी धावडवाडी नेलकरंजी परिसरातील शेतकऱ्यांनी या बागा चांगल्या प्रकारे जोपासल्या आहेत. त्या प्रकारे चांगले उत्पन्नही त्यांना मिळते. दोन वर्षात वातावरणाच्या बदलामुळे चांगलाच फटका या शेतकऱ्यांना बसला. 

देशी आंबाही वेळेत 

देशी आंबा तालुक्‍यात अत्यंत अल्प प्रमाणात सध्या झाडे आहेत. मोठ्या प्रमाणात असणारी देशी आंब्याची झाडे काही नैसर्गिक रित्या तर काही झाडे मोठ्या प्रमाणात तोड करण्यात आली.याचा परिणाम सध्या देशी आंबा फळ पिकावर होताना जाणवू लागला आहे. देशी आंब्याची चव अस्सल आंबा रसास व खाताना चाखता येते. अल्प प्रमाणात या पिकाची झाडे असल्यामुळे कमी प्रमाणात हे फळ बाजारात येते. यावर्षी सर्वसामान्यांना फळांचा राजा आंबा वेळेत हंगामात येणार आहे.  

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT