Mangsuli Khandoba Yatra Sakal
पश्चिम महाराष्ट्र

मंगसुळी खंडोबा यात्रेत यळकोट यळकोट घे`चा नामघोष

यळकोट यळकोट घे, या नामघोषात विविध भागातून आलेल्या लाखो भाविकांनी सोमवारी (ता. 11) मंगसुळी येथील खंडोबाचे दर्शन घेतले.

रंगनाथ देशिंगकर

यळकोट यळकोट घे, या नामघोषात विविध भागातून आलेल्या लाखो भाविकांनी सोमवारी (ता. 11) मंगसुळी येथील खंडोबाचे दर्शन घेतले.

उगारखुर्द - यळकोट यळकोट घे, या नामघोषात विविध भागातून आलेल्या लाखो भाविकांनी (Passionate) सोमवारी (ता. 11) मंगसुळी (Mangsuli) येथील खंडोबाचे दर्शन (Khandoba Yatra) घेतले. सोमवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. पहाटेपासूनच विविध वाहनांनी भाविक दाखल झाले. दोन वर्षांनी यात्रा भरल्याने रणरणत्या उन्हातही लाखो भाविकांनी गर्दी केली आहे.

खंडोबा मंदिर परिसरात असलेल्या विस्तीर्ण माळावर विविध प्रकारची दुकाने, उपाहारगृहे, शीतपेयगृहे, रसवंतीगृहे, मेवा-मिठाई, नारळ, कापूर, फळांचे स्टाॅल उभारले आहेत. ग्रामपंचायतीतर्फे पिण्याचा पाण्याचा पुरवठा, वीज, आरोग्य केंद्रातील डाॅक्टरांचे पथक सेवेत आहे. कागवाड पोलिसांनी यात्रेत बंदोबस्त ठेवला आहे. विविध मंदिरातील वाघे दाखल झाले आहेत. गेली दोन वर्षे कोरोनामुळे यात्रा झाली नव्हती. यंदा यात्रा भरल्याने भाविक, ग्रामस्थ, व्यापारी व परिसरात उत्साही वातावरण आहे. यात्रा शनिवार (ता. 9) पासून सुरु झाली असून ती बुधवारी (ता. 13) अखेर पर्यंत आहे. सोमवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. मंदिरात घोडा पालखी प्रदक्षिणा सुरु आहे. सोमवारी उत्तररात्री साखळी तोडण्याचा कार्यक्रम होणार आहे.

पॅसेंजर बंद असल्याने भाविकांची गैरसोय

आज खंडोबा यात्रेचा मुख्य दिवस होता. कर्नाटक, महाराष्ट्रातील विविध भागातील मंगसुळीस येणारया वाहनांची गर्दी झाली होती. कोल्हापूर-बंगळूर राणी चन्नम्मा एक्सप्रेस, बेळगाव-शेडबाळ पॅसेंजरने बेळगाव, हुबळीकडून येणारे भाविक उगार खुर्द रेल्वेस्थानकात उतरले. तेथून खासगी वाहनाने ते मंगसुळीस आले होते. गेल्या दोन वर्षापासून हुबळी, बेळगाव, वास्को दरम्यान पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने विविध भागातून मंगसुळीस येणारया भाविकांची गैरसोय झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : कल्ला होणार... CSK संजू, सर्फराज यांच्यासह ५ खेळाडूंना पदार्पणाची संधी देणार, आयपीएल गाजवणार

IDBI बँकेत १३०० पदांसाठी मोठी भरती; पदवीधर उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

वृद्ध, दिव्यांग कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार, कार्यालयांत विशेष सुविधा मिळणार; पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

MLA Randhir Savarkar: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज फेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी: आमदार रणधीर सावरकर, अन्याय दूर करा!

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

SCROLL FOR NEXT