पश्चिम महाराष्ट्र

जिल्हा बँक अध्यक्षपदी मानसिंगराव नाईक निश्चित; उपाध्यक्ष कोण ठरणार?

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड सोमवारी होणार

सकाळ वृत्तसेवा

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव नाईक यांची निवड निश्चित झाली आहे. आता केवळ औपचारिकता बाकी असून सोमवारी (ता. ६) निवडीचा कार्यक्रम होत आहे. उपाध्यक्षपदासाठी जयश्री पाटील यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड सोमवारी होणार आहे. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक दुपारी तीन वाजता जिल्हा बँकेच्या सभागृहात होणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे सहकार पॅनेल विरुद्ध भाजप प्रणीत शेतकरी पॅनेल यांच्यात झाली. सहकार पॅनेलने १७-४ फरकाने विजय मिळवला. शेतकरी पॅनेलला चार जागांवर समाधान मानावे लागले. महाआघाडीतील राष्ट्रवादीने ९, कॉंग्रेसने ५ तर शिवसेनेने ३ जागा मिळवल्या.

बॅंकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहणार असून, अध्यक्ष पदासाठी शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांचे नाव निश्चित ठरले आहे. केवळ औपचारिकता बाकी आहे.

याशिवाय उपाध्यक्ष पदासाठी जयश्री पाटील, महेंद्र लाड यांची नावे चर्चेत असून, राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांना सर्वाधिकार देण्यात आले आहेत. तेच या नावाची घोषणा करणार आहेत. अध्यक्षपद तीन वर्षे राष्ट्रवादीकडे आणि दोन वर्षे कॉंग्रेसकडे अशी चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.

दुपारी ३ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड होणार आहे. निवडणूक बिनविरोध होईल असेच चित्र आहे. त्यामुळेच संचालक मंडळ बैठकीत नेमके काय ठरते यावर पुढील दिशा ठरणार आहे. निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाल्यास सविस्तर कार्यक्रम घेण्याची गरज नाही. जो कार्यक्रम असेल तो दुपारी बैठकीतच जाहीर करण्यात येणार आहे.

शिराळ्याचे राष्ट्रवादीचे आमदार मानसिंग नाईक यांची निवड निश्चित मानली जात आहे. ते सलग दुसऱ्यांदा बँकेच्या संचालकपदी निवडून आले आहेत. यंदाच्या निवडणुकीत ते बिनविरोध आले आहेत. मागीलवेळी त्यांची अध्यक्षपदाची संधी हुकली. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पालकमंत्री जयंत पाटील हे आमदार नाईक यांनाच अध्यक्षपदी विराजमान करतील हे जवळपास निश्‍चित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND-A vs NZ-A Live Score: यशस्वी जैस्वालचा शतकी धडाका... सलग दुसऱ्या सामन्यात किवी गोलंदाजांना ठोकून काढले; १६ चौकार, २ षटकार अन्...

Latest Marathi News Live Update : 'टीसीएस'प्रकरणी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील सहआरोपी, पोलिस तपासात नाव समोर

MPSC Exam : ‘एमपीएससी’ गट-क पूर्वपरीक्षा लांबणीवर;आता होणार २४ जानेवारीला; पदसंख्येत ११ हजार १० जागांची वाढ

IND vs NZ 2nd ODI Live : पावसाचा खेळ अन् षटकांची संख्या झाली कमी; शुभमन गिलने टॉस जिंकून Playing XI बाबत घेतला धाडसी निर्णय

Pune News: पुण्यात १६ हजार वाहनांची नोंदणी ; गेल्या दहा दिवसांतील आकडेवारी; दिवाळीच्या मुहूर्तावर मोठी खरेदी

SCROLL FOR NEXT