Many entered in the curfew: Tasgaon taluka under threat of outsiders 
पश्चिम महाराष्ट्र

संचारबंदीतही अनेकांनी केला प्रवेश : तासगावकरांना बाहेरच्यांचाच धोका

रवींद्र माने

तासगाव : तासगाव (जि. सांगली) तालुक्‍यात दररोज बाहेरून आलेल्यांची संख्या पाहता प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. तासगावातील त्या महिला पोलिसावरील कारवाई नंतर धोका बाहेरून येण्याची शक्‍यता आणखी अधोरेखित झाली आहे. सुदैवाने आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण सापडला नाही हे महत्त्वाचे ! 

तासगाव तालुका 22 मार्चपासून 49 दिवस कुलूपबंद आहे. नागरिकांनी घेतलेली काळजी अथवा कोणताही संसर्ग न झाल्याने एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नाही, मात्र इतके दिवस घेतलेली काळजी वाया जाते की काय ? अशी भीती वाटू लागली आहे. तासगाव आणि तालुक्‍यात दररोज मुंबई, पुण्यातील लोक येऊ लागले आहेत. देशभरातून गलाई सारख्या कामासाठी गेलेले परत येऊ लागले आहेत. त्यापैकी अनेकांची माहिती प्रशासनाला मिळते आहे, तर अनेकदा ही माहिती लपवून ठेवण्याचा प्रकार होतो आहे.

प्रशासन माहिती मिळाल्यानंतर आलेले आजारी नाहीत ना याची खात्री करून त्यांना घरातच रहाण्याच्या सूचना देते. आतापर्यंत 53 जण होम क्वारंटाईन करण्यात आलेले होते. हे सगळे बाहेरून आलेलं होते हे विशेष! गेल्या चार-पाच दिवसांत सगळ्या जिल्ह्यांच्या सीमा बंद असल्या तरी बाहेरून येणाऱ्याची संख्या लक्षणीय वाढली आहे. सध्या होम क्वांरटाईन करण्यापेक्षा गुन्हे दाखल केले जात असल्याने आलेले आपली माहिती लपविण्याचा प्रयत्न करत आहेत. ग्रामीण भागातील काहीजण द्राक्ष वाहतुकीसाठी अन्य जिल्ह्यात आणि परराज्यात जाऊन येत आहेत, त्यांची कोठेही तपासणी होत नाही. 

त्यामुळे तासगावकर स्वतः कुलूपबंद असले तरी बाहेरून धोका होण्याच्या शक्‍यता नाकारता येत नसल्याने नागरिक धास्तावले आहेत. बाहेरील गाड्यासाठी तासगाव शहरातील मुख्य रस्ता वगळता अन्य रस्ते बंद करण्यात आले आहेत. चेक पोस्ट वर सगळीच वाहने चेक होतातच असे नाही यापार्श्वभूमीवर प्रशासनाने आणखी काळजी घेण्याच्या अपेक्षा व्यक्त होत आहेत. 

येवढे आले बाहेरून 
22 मार्चपासून तासगाव शहरात 121 जण बाहेरून आले असल्याची नोंद पालिका यंत्रणेने सतत होणाऱ्या सर्व्हेच्या माध्यमातून घेतली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT