पश्चिम महाराष्ट्र

#MarathaKrantiMorcha सांगलीत बेमुदत धरणे आंदोलन सुरु

सकाळवृत्तसेवा

सांगली - राज्य सरकारने मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यात आजपासून तालुक्‍यांसह विविध गावात बेमुदत धरणे आंदोलनाला आज सुरुवात झाली.

सांगली शहरातील जुन्या स्टेशन रोडवरील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यानजिकच्या जागेत आंदोलन सुरु झाले आहे. "मराठा आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच, एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतोय देत नाय, घेतल्याशिवाय रहात नाही,' आदी घोषणांनी हा परिसर दणाणून गेला आहे.  

दरम्यान, जिल्ह्यातील झरे व घरनिकी येथे आज कडकडीत बंद पाळण्यात आला. आरक्षणासाठीचे आंदोलन अहिंसक मार्गाने करण्याची घोषणा क्रांती मोर्चाने केली आहे. एस. टी, शासकीय मालमत्तेचे नुकसान कोणीही करू नये असे आवाहन केले आहे. सांगलीसह जिल्ह्यात होणारा क्रांतिदिनीचा बंदही शांततेच करण्याचे नियोजन आहे.

जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय, पाच-दहा हजार लोकसंख्येवरील गावात ग्रामपंचायतींसमोरही आज धरणे आंदोलन झाले. मराठा क्रांतीचे समन्वयक डॉ. संजय पाटील, उत्तम साखळकर, अमोल सूर्यवंशी, प्रदीप पाटील, अजयकुमार देशमुख, प्रशांत पवार, रोहित दिंडे, शहाजी भोसले, अमोल सुर्यवंशी, किर्तीराज बर्गे आदी प्रमुख सहभागी झाले होते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT