Maratha Kranti Morcha 
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Kranti Morcha: पंढरपूर तहसीलवर गाढव मोर्चा

सकाळवृत्तसेवा

पंढरपूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आता रणरागिणी आक्रमक झाल्या आहेत. आरक्षणप्रश्नी सरकारला जागे करण्यासाठी महिलांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात आला. स्टेशन रोडमार्गे निघालेल्या मोर्चाने तहसील कार्यालयावर धडक मारली. या वेळी सरकार आणि सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात घोषणा देत निषेध करण्यात आला. महिलांनी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना मागण्यांचे लेखी निवेदन दिले. त्यानंतर अनेक महिलांनी आरक्षणाची मागणी करत सरकारच्या वेळकाढू धोरणाबद्दल नाराजी व्यक्त केली. दरम्यान, येथील तहसील कार्यालयासमोर सात दिवसांपासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज सायंकाळी समारोप झाला. दुपारी श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. सात दिवसांपासून आंदोलनस्थळी अन्नदान केले जात होते. आज येथील काही मुस्लिम समाजातील तरुणांनी अन्नदान करून सामाजिक समतेचा संदेश दिला.

रक्तदान करून निषेध
आरक्षण मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने विविध प्रकारची आंदोलने सुरू आहेत. आज येथील सकल मराठा समाजाच्या वतीने रक्तदान करून सरकारचा निषेध केला. तहसील कार्यालयाजवळ सुरू असलेल्या आंदोलनस्थळी सकाळपासून रक्तदानासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दिवसभरात शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तदान करून आरक्षण मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belgaum Onion Prices : कांद्याच्या दरात 500 रुपयांची वाढ; बटाट्याचे दरही 200 रुपयांनी वधारले, एपीएमसीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक

Dharashiv Crime News: अल्पवयीन दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधमाविरुद्ध पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल

बंद पाणी योजना तातडीने सुरू करा, सर्व उपाययोजनानंतर टँकर हा अंतिम पर्याय ठेवा; बावनकुळेंचे निर्देश

Latest Marathi News Update : पुण्यात CBI ची मोठी कारवाई! MIL अधिकाऱ्याच्या घरातून १.७३ कोटींची रोकड जप्त

Jalna News: शेतकरी दुष्काळात, भाजप नेत्याकडून पैशांची उधळपट्टी; माजी आमदारावर उधळल्या नोटा

SCROLL FOR NEXT