Maratha Kunbi Registration Cheaking Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : ‘मराठा कुणबी’च्या एक लाख २३ हजार ६२३ कागदपत्रांची तपासणी; एकही नोंद नाही

मिरज पूर्व आणि पश्चिम भागांतर्गत तहसील कार्यालयात मराठा समाजाला कुणबी-मराठा दाखले देण्यासाठी अभिलेखागारात सुरू असलेल्या कागदपत्र तपासणीत अद्यापही कोणतीच नोंद सापडलेली नाही.

सकाळ वृत्तसेवा

मिरज - मिरज पूर्व आणि पश्चिम भागांतर्गत तहसील कार्यालयात मराठा समाजाला कुणबी-मराठा दाखले देण्यासाठी अभिलेखागारात सुरू असलेल्या कागदपत्र तपासणीत अद्यापही कोणतीच नोंद सापडलेली नाही. आतापर्यंत मिरज तालुका प्रशासनाकडून एक लाख २३ हजार ६२३ कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली आहे.

मराठा समाजाची वंशावळ, कोणाच्या घरी जुन्या कागदपत्रांत खरेदी-विक्री पत्र, गहाण खताचा दस्त, सावकाराकडे जमीन गहाण देताना केलेल्या करारपत्रात जातीचा उल्लेख आढळल्यास तहसीलदार कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी केले आहे.

जरांगे-पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा कुणबी या जातीच्या नोंदी शोधून काढण्यासाठी महसूल यंत्रणा कामास लागली आहे. मिरज तालुक्यातील सुमारे ४० तलाठी, मंडलाधिकारी, कोतवाल रेकॉर्ड विभागात गेली चार दिवस मराठी कुणबी जातीच्या नोंदी शोधत आहेत. मात्र ७१ गावांत एकही नोंद सापडली नसल्याचे सांगण्यात आले.

मराठा कुणबी दाखल्याबाबत ३ नोव्हेंबर रोजी शासनाने दिलेल्या सूचनेनुसार कुणबी जातीचा उल्लेख असलेल्या कुटुंबांना जातीचे दाखले देण्यात येणार आहेत. त्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. हे दाखले देण्यासाठी कालावधी कमी असल्याने महसूल यंत्रणेस त्यांच्याकडील पुरावे शोधून उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार रेकॉर्ड विभाग, भूमी अभिलेख विभागाकडील मिरज तालुक्यात येणाऱ्या ७१ गावातील १९६७ पूर्वीचे पक्काबुक, शेतवारपत्रक, ‘महसूल’कडील १९६७ पूर्वीची जन्म-मृत्यू रजिस्टर तपासणी, १९६७ पूर्वीच्या रजिस्टरमधील नोंद, खासरा पद्धत ७/१२ पूर्वीचे क-ड-ई पत्रक तपासण्यात येत आहे. तलाठी व मंडलाधिकारी यांना यासाठी कामाला लावण्यात आले आहे.

जुनी कागदपत्रे तपासताना काही नोंदी या मोडी भाषेत असल्याने मोडी लिपी जाणकारांकडून वाचून घेण्यात येत आहे. सर्व गावाचे मंडलाधिकारी, तलाठी, कोतवाल कुणबी पुरावे शोधण्यात व्यस्त असल्याने अन्य महसूली कामे ठप्प आहेत. मिरज तालुक्यातील रेकॉर्डची तपासणी जवळपास पूर्ण झाली असून एकही जुनी नोंद आढळली नसल्याचे तहसीलदार अपर्णा मोरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT