Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal Esakal
पश्चिम महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : भुजबळांनी लोकांचे खाल्ले, रक्त पिले, त्यामुळे जेलवारी

मनोज जरांगे-पाटील आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची आधी विटा येथे सभा झाली. त्यानंतर तासगाव येथे त्यांनी लोकांशी संवाद साधला.

सकाळ वृत्तसेवा

सांगली - गोदावरी खोरे संपन्न असल्याने त्या भागात लोक विस्थापित होवून रहायला येतात. मीही आलोय. मी सासऱ्याची भाकरी तोडतोय, अशी माझ्याबद्दल कुठल्यातरी माकडाने चुकीची माहिती भुजबळांना दिलीय. पण, लोकांचे खाल्ल्यानेच भूजबळ जेलमध्ये जावून आलेत. त्यांना मराठ्यांचे आरक्षण खुपायला लागले आहे. समाजात दंगली घडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा पलटवार मनोज जरांगे पाटील यांनी आज येथे केला.

मनोज जरांगे-पाटील आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची आधी विटा येथे सभा झाली. त्यानंतर तासगाव येथे त्यांनी लोकांशी संवाद साधला. भर दुपारी तीन वाजता सांगलीत तरुण भारत क्रीडांगणावर त्यांनी सभेला संबोधित केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भुजबळांवर प्रतिहल्ला चढवला. भुजबळ यांनी अंबड येथील सभेत जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

ते म्हणाले, ‘मराठा ओबीसीत आला आहे, हे भुजबळांचा कळून चुकलंय. आता आम्ही चिडावे, यासाठी ते काहीपण बोलत आहेत. मी काय शिकलो, हे त्यांना काय करायचे? लोकांचे खाल्ल्याने ते जेलमध्ये जावून आले. तुम्ही लोकांचे पैसे खाता, रक्त पिता. आता भुजबळांचे वय झाले आहे, त्यामुळे ते बडबडत आहेत. मराठ्यांची एकजूट त्यांना खपत नाही. आता उत्तर द्यायला सक्षम आहोत, मात्र तुम्हाला उत्तर द्यायचे नाही. तुम्ही खालच्या पातळावरचे आहात.

भुजबळ कायदा सुव्यवस्था बिघडवत आहेत. आम्ही तुमचा बायोडाटा गोळा केला आहे. आम्ही तुमच्या शेपटावर पाय दिला नाही, तुम्ही आमच्या पायावर पाय देवू नका. ओबीसी आरक्षणात येवू नये म्हणून हा खटाटोप सुरु आहे. ओबीसी आणि मराठ्यांत वितुष्ट येणार नाही, वाद होणार नाही. कुणबी नोंदी सापडल्या म्हणजे सातबारा मिळाला आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT