शिवेंद्रसिंहराजे भोसले 
पश्चिम महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी शिवेंद्रसिंहराजे आग्रही

सकाळवृत्तसेवा

सातारा - मराठा आरक्षणासाठी सुरवातीपासूनच आग्रही आणि आक्रमक राहिलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर जोरदार आवाज उठवला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, अजित पवार यांच्यासोबत शिवेंद्रसिंहराजे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावर ताताडीने निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी काल सभागृहात केली. 

कोपर्डी घटनेनंतर साताऱ्यात निघालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चात शिवेंद्रसिंहराजेंनी सक्रिय सहभाग घेऊन मराठा समाजाचे आरक्षण आणि विविध मागण्या मान्य होण्यासाठी आक्रमक भूमिका स्वीकारली. त्यानंतर झालेल्या विविध आंदोलनांत शिवेंद्रसिंहराजे हे मराठा समाजाचा एक घटक म्हणून सहभागी होते. साताऱ्यात हा लढा तीव्र होण्यासाठी मोर्चा, कॅण्डल मार्च आदी आंदोलने यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रत्येक बैठकीला हजेरी लावली होती. तसेच सर्व प्रकारच्या आंदोलनासाठी आयोजकांना सर्व प्रकारचे सहकार्य करून मोर्चा आणि कॅण्डल मार्च यशस्वी करण्यासाठी योगदान दिले होते. 

नागपूर येथील अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजणार का, याकडे तमाम मराठा समाजाचे लक्ष आहे. सभागृहात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली. मात्र, सरकार आरक्षणाबाबत उदासीन असल्याचे दिसताच विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, अजित पवार आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले हे तिघे आक्रमक झाले. त्यांनी सभापतींच्यासमोर येऊन जोरदार आक्षेप नोंदवला. शिवेंद्रसिंहराजे यांनी आक्रमक पवित्रा घेत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी रोखठोख भूमिका घेतली. सरकारने मराठा आरक्षणावर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी या तिघांनी केली. यामुळे सरकारला मराठा आरक्षणाच्या मुद्यावर नमते घ्यावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Shivsena News : शिवसेनेला धनुष्यबाण मिळालं तरी कसं? बघा संपुर्ण इतिहास

पत्राच्या घरापासून सुरुवात; आज हक्काच्या घरात गृहप्रवेश, पण सुख पाहायला बहीण नाही, लोकप्रिय इन्फ्लुएन्सरची पोस्ट चर्चेत

Leopard Attack: दूध घालून परतताना उसातून बिबट्याची झेप! दुचाकीस्वार शेतकऱ्याने हल्ला चुकवत वाचवला जीव, बिबट्याच्या हल्ल्याने थरकाप..

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT